Chinchwad : आकर्षक सजवलेले रथ व भव्य मिरवणूकांनी चिंचवडगावातील गणरायाला निरोप

आकर्षक सजवलेले रथ,ढोल-ताशांचा दणदणाट, विद्युत रोषणाई, फुलांनी सजवलेले रथ
Chinchwad
Chinchwadsakal
Updated on

जुनी सांगवी : आकर्षक सजवलेले रथ,ढोल-ताशांचा दणदणाट, विद्युत रोषणाई, फुलांनी सजवलेले रथ, फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात मिरवणूकांनी चिंचवडगावकरांनी गणपती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. कोरोनानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा झाल्याने विसर्जन मिरवणुकीत मंडळे, गणेशभक्तांचा मोठा उत्साह दिसून आला. रात्री बारापर्यंत ३४ गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. रात्री उशीरा मिरवणूकांना सुरूवात झाली.

तर काही मंडळांनी दुपारी मिरवणुका काढून गणपती बाप्पाला निरोप दिला. मिरवणुका पाहण्यासाठी चाफेकर चौक ते पवना घाटापर्यंत रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चापेकर चौकात महापालिकेच्यावतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, माजी नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, माधुरी कुलकर्णी, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.

चिंचवडचा राजा मित्र मंडळाने आकर्षक ‘भक्तीरथ’ उभारला होता. ज्ञानदीप मित्र मंडळाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देखावा साकारला होता. गांधी पेठ तालीम मंडळांनेही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देखावा केला होता. मिरवणुकीत दांडपट्टा, लाठीकाठी असे मर्दानी खेळ सादर केले. क्रांतीविर भगतसिंह मित्र मंडळाने फुलांनी सजवलेल्या पालखीतुन आरास केली होती. मुंजोबा मित्र मंडळाने ‘कृष्णरथ’ साकारला होता. गावडे कॉलनी मित्र मंडळाने ढोल ताशा वादन मिरवणूकीने बाप्पाला निरोप दिला. चिंचवडगावातील मोरया मित्र मंडळाने शंकराची प्रतिकृती साकारली होती. लोंढेनगर आदर्श तरुण मित्र मंडळाने क्रांतिकारकांच्या प्रतिमा लावल्या होत्या.

भोई आळी उत्कृष्ट तरुण मित्र मंडळाने फुलांची उधळण केली. नवतरुण मित्र मंडळाने ‘बालाजी रथ’ साकारला होता. अष्टविनायक मंडळाने शंकराची पिंड साकारली होती. गावडे पार्क मित्र मंडळाने लक्षवेधक ‘सुवर्णरथ’ साकारला होता.

श्रीमान महासाधू मोरया गोसावी मित्र मंडळाने ‘विठ्ठलरथ’ साकारला होता. विद्युत रोषणाई केली होती. ओम साई मित्रमंडळाने भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढली. नवनाथ मंडळाच्या मिरवणुकीत ज्ञाप्रबोधिनीच्या मुलींच्या ढोल ताशा पथकाने वादन केले. समता तरुण मंडळाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देखावा साकारला होता. नवभारत तरुण मंडळाने आकर्षक फुलांच्या सजावटी केली होती. शिवाजी उदय मंडळाने हिमालय पर्वत प्रतिकृती साकारली होती. समर्थ कॉलनी मित्र मंडळाने विद्युत रोषणाई केली होती. काळभैरवनाथ मित्र मंडळाने ‘बालाजी रथ’ साकारला होता. मयुरेश्वर मित्र मंडळाने ‘शिवरथ’ साकारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.