Chinchwad - सकाळ माध्यम समूहाच्या पिंपरी-चिंचवड ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ टिम (यिन) व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्यावतीने येत्या शुक्रवारी (ता. १४) ‘कॉफी विथ यिन मिनिस्टर’चे आयोजन केले आहे. ‘यिन’च्या माध्यमातून युवकांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टरच्या सभागृहात सकाळी दहाला कार्यक्रमाला सुरवात होईल. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आणि विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक हे युवकांना यशस्वी व्यवसाय, संघ बांधणी, युवा व राजकारण, स्टार्टअप - द नेक्स्ट बिग थिंग, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
यात औद्योगिक शिक्षण मंडळाच्या प्रा. तृप्ती कदम, डॉ. डी. वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी रिसर्च सेंटरचे डॉ. मारुती शेलार, पी. सी. ई. टी. चे एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, निगडीचे डॉ. काजल माहेश्वरी, एस.एन.बी.पी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीजचे प्रा. अमोल बडे,
सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसीच्या डॉ. स्वाती देशमुख, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजचे डॉ. राजेंद्र कांकरिया, अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्रा. गणेश शितोळे, मंगणमल उधाराम कॉलेज ऑफ कॉमर्स, पिंपरीचे प्रा. हेमंत राजेस्थ, जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडेचे डॉ. अमेय चौधरी, प्रा.अविनाश गोलांडे आदी प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.
गेल्या आठ वर्षांपासून ‘यिन’मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजन विक्रम खाडे (गटनेते), सुमेध ठाणांबीर, ऋषीकेश पवार, ऋषीकेश औरादे , सोहेल शेख, संदेश हुरसाळे, पूजा काळे, आरजू मुलाणी, श्रुती मोहरकर या कोअर टीमने केले. गौरव विटकर, प्रतीक पोळ, कुणाल सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.
‘यिन’चे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार
आचल डवले (मुख्यमंत्री), काजल चव्हाण (उपमुख्यमंत्री), अभिषेक कोल्हे (उपसभापती), अजहरुद्दीन शेख (कृषी मंत्री), श्रध्दा पठारे (महिला व बालविकास मंत्री), साईप्रसाद जाधव (दुग्धविकास विकास व पशुसंवर्धन मंत्री), दिनेश भंडारे (सांस्कृतिक मंत्री), बाजीराव शिंदे (स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री), सखाराम कराड (विकास माहिती व तंत्रज्ञान व जनसंपर्क मंत्री ), अनिल वाघमोडे (पर्यावरण मंत्री), विरोधी पक्ष सदस्य राजलक्ष्मी कदम, विशाखा पठ्ठे ,
चैत्राली वर्तक, विश्वजीत पाटील, अक्षय खाटीक, अजय जवंजाळ, पृथ्वीराज चव्हाण, अब्दुल बासुकीनाथ मुल्ला, संदेश डोंबे, योगिराज खांडे, नौमान खान तसेच केंद्रीय मंत्री मंडळातील दिव्या भोसले (सभापती), अनिकेत बनसोडे (उपसभापती), नीलेश चव्हाणके (रोजगार समिती अध्यक्ष), रविराज मासाळ (रोजगार समिती कार्याध्यक्ष ) हे उपस्थित राहतील.
हे मंत्री तरुणाईशी संवाद साधणार आहेत. आर. जे. प्रशांत गाडेकर आणि हर्षवर्धीनी शिरास हे या कार्यक्रमातील सहभागी मंत्र्यांची मुलाखत घेतील. सर्व मंत्र्याच्या स्वागतासाठी स्थानिक मंत्री चेतन लिम्हण (सार्वजनिक बांधकाम मंत्री), सलोनी सिंह (सभापती) उपस्थित राहतील. अधिक माहितीसाठी जस्टिन मॅथ्यू (नोंदणी व्यवस्थापक, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी) आणि अक्षय बर्गे (यिन समन्वयक) यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.