Ajit Pawar : भाजप निवडणुकीत कुठल्याही स्तरावर जाते

भाजप निवडणुकीत कुठल्याही स्तरावर जाते. गंभीर आजारी असताना आयसीयुतून खासदार गिरीश बापट यांना नळी लावून प्रचारात आणले.
 Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
Updated on
Summary

भाजप निवडणुकीत कुठल्याही स्तरावर जाते. गंभीर आजारी असताना आयसीयुतून खासदार गिरीश बापट यांना नळी लावून प्रचारात आणले.

पिंपरी - भाजप निवडणुकीत कुठल्याही स्तरावर जाते. गंभीर आजारी असताना आयसीयुतून खासदार गिरीश बापट यांना नळी लावून प्रचारात आणले. जनाची नाही मनाची तरी बाळगायला हवी होती. कुठल्या स्तरावर ही मंडळी जातात, हे जनतेने पाहिले. माणसं जोडायची असतात; तोडायची नसतात, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर शनिवारी (ता. १८) पिंपळे निलख येथे टिका केली.

चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केली. यावेळी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार सुनिल शेळके, आमदार राजेश राठोड, कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, अजित गव्हाणे, सचिन भोसले, कैलास कदम, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, राज्य सभा व विधानपरिषदेसाठीही मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप गंभीर आजारी असताना मतदानासाठी अम्ब्युलन्समधून आणले होते. एक-दोन मते कमी पडल्याने फरक पडला असता का? किती स्वार्थी असावे. स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या जीवाकडे न पाहणारी ही माणसं.

अजित पवार म्हणाले -

- राज्यात तोडाफोडीचे राजकारण; राज्य सरकारकडून लोकांच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिले जात नाही

- शिवसेना ज्यांनी स्थापन केली त्यांच्या मुलाकडून पक्ष व चिन्ह काढून घेतले

- जनतेला न रुचणारा निर्णय घेतला तर; जनता जशास तसे उत्तर देते, हा इतिहास विरु नये

- आमचे फोडून आमदार नेले, स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणता साधे कार्यकर्ते तयार करता येत नाहीत

- पिंपरी-चिंचवडला सत्ता असताना साधे भामा आसखेड, आंद्रा धरणाचे पाणी आणू शकले नाहीत

- पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप काळात भ्रष्टाचार बोकाळला; आम्ही भ्रष्टाचार मुक्त कारभार करु

- तोडाफोडीचे राजकारण करुन सत्तेत आलेले जनतेला आवडले नाही; त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकतात

- चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता; पालकमंत्री म्हणून गेल्या ७-८ महिन्यात पुण्याचे कोणते प्रश्‍न सोडविले

- पालकमंत्र्यांनी पुण्याच्या पालकमंत्र्यांसारखे वागावे; त्या पदाला एक परंपरा आहे

- दोन्ही मेट्रोचे घाईघाईने उद्घाटन केले; आता त्यामध्ये लोक वाढदिवस साजरा करतात

- मेट्रो निगडी ते कात्रज व्हायला हवी होती; यांच्यात विकास कामे करण्याची धमक नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.