पिंपरीत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नाही

vaccination
vaccinationesakal
Updated on

पिंपरी : महापालिकेकडून सोमवारी (ता. ३१) १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार नाही. ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच, कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांना दुसरा डोस यमुनानगर, तालेरा, नवीन जिजामाता, खिंवसरा पाटील थेरगाव, नवीन आकुर्डी ही रुग्णालये, कासारवाडी दवाखाना, आचार्य अत्रे सभागृह व सावित्रीबाई फुले शाळा भोसरी येथे दिला जाणार आहे. कोविशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. त्याची व्यवस्था महापालिका दवाखाने, रुग्णालयांसह ५७ ठिकाणी केली आहे.

vaccination
पुणे जिल्ह्यात लहान मुलांसाठी 8000 बेडस्

पिंपरी-चिंचवडमध्ये ४१९ नवीन रुग्ण

पिंपरी शहरात रविवारी ४१९ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ५० हजार १५३ झाली आहे. आज ५४२ जणांना डिस्चार्ज मिळाला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ४० हजार ९०२ झाली आहे. सध्या पाच हजार २०५ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत चार हजार ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत दोन हजार ५४६ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ६५९ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत चार लाख ९५ हजार ७०७ व्यक्तींना लस घेतली आहे. सध्या १६३ मेजर व एक हजार १७९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. येथील एक हजार ९५६ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. सहा हजार ८१९ जणांचे विलगीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.