तळेगाव स्टेशन - दोन दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी गुरुवारी (ता. २१) रात्री सव्वा आठच्या सुमारास तळेगाव दाभाडे शहरात लागोपाठ चार ठिकाणी हवेत गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. तुकाराम नगर, गजानन महाराज मंदिर, शाळा चौक आणि राजेंद्र चौक अशा चार ठिकाणी हवेत गोळीबार झाल्याची माहीती नागरिकांकडून कळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप रायण्णावर आणि सहका-यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एक मोपेड आणि एक मोटारसायकल अशा दोन दुचाकीवर बसलेल्या प्रत्येकी तीन जणांनी हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. गजानन महाराज मंदिराजवळ काडतुसांच्या दोन पुंगळ्या सापडल्याची माहीती पोलिसांनी दिली.
गोळीबार झालेल्या ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह आरोपींची शोधप्रक्रिया तळेगाव दाभाडे पोलीसांनी सुरु केली आहे. मुख्य बाजारपेठेसह नागरी वस्तीत भर वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी रात्री घटनास्थळी भेट घेऊन आढावा घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.