लॉकडाउनचा तर फटका आहेच, मात्र पिंपरीकर झाले 'या' कारणामुळे हैराण

work.jpg
work.jpg
Updated on

पिंपरी : दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शहरातील विकासकामे पूर्ण केली जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा मोठा फटका या कामांना बसला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहराच्या विविध भागांमध्ये ड्रेनेजचे पाइप बदलणे, पिण्याची पाइपलाइन टाकणे, रस्ता दुरुस्तीची कामे जोरात सुरु आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शहवासियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

कोरोनाचा संसर्ग मार्च महिन्यामध्ये वाढू लागल्यानंतर सरकारकडून लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत महापालिकेकडून करण्यात येणारी विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली. जून महिन्यामध्ये लॉकडाउन शिथिल होण्यास सुरुवात झाली, त्यानंतर दोन महिन्यांपासून अडकून पडलेल्या कामे पूर्ण करण्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी दुसरीकडे राज्यात पाउस दाखल झाला आहे.

दरम्यान, शहरातल्या अनेक भागातील रस्ते नवे पाइप टाकण्यासाठी खोदण्यात आले आहेत तर काही भागांमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे अनेक भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली तर याठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार होउ शकतात, त्यामुळे वाहतूक कोंडी, आरोग्याच्या समस्या, अशा अडचणी उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. सध्या शहरात थेरगाव रोड, डांगे चौक, रहाटणी, पिंपरी, आकुर्डी, चिंचवड अशा अनेक भागांमध्ये ही कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. दोन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या लॉकडाउनमुळे कामे बंद होती. मजूर, कामगारही गावाला गेले होते. आता परिस्थिती हळूहळू पूर्ववत होउ लागली असून काम लवकर पूर्ण व्हावे, म्हणून कंत्राटदारांनी तातडीने या कामांना सुरुवात केली आहे. 

नागरिक हैराण- ऐन पावसाळ्यात महापालिकेकडून शहराच्या अनेक भागांमध्ये विकासकामे सुरु असल्यामुळे नागरिक देखील हैराण झाले आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेक भागांमध्ये पाणी साठण्याचे प्रकार होत असतात. आता या विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या खड्यांमध्ये पाणी साठण्याचे प्रकार होउन या कामांमध्ये पुन्हा खंड पडू शकतो. त्यामुळे नागरिकांना देखील अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे पालिका प्रशासनाने पुढल्या दहा ते पंधरा दिवसांच्या अवधीत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबधित कंत्राटदाराला द्याव्यात, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.