PCMC Samvidhan Bhavan : पिंपरीत होणार संविधान भवन; १२० कोटींची निविदा प्रसिद्ध

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित भारतीय संविधान भवनासाठी भूखंड आवश्यक होता. त्याचे हस्तांतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) महापालिकेकडे झाले आहे.
Pimpri-Chinchwad Set to Build India's First Constitution Building as Tender Process
Pimpri-Chinchwad Set to Build India's First Constitution Building as Tender Processsakal
Updated on

India's first-ever Constitution Building and Vipassana Center : जगातील सर्वांत मोठी लोकशाहीचा पाया म्हणजे आपली राज्यघटना. या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार व जनजागृतीसाठी देशातील पहिले संविधान भवन पिंपरी चिंचवडमध्ये उभारले जात आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने १२० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात केली आहे.

भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवडमध्ये संविधान भवन आणि विपश्यना केंद्र उभारण्याचत येणार आहे. यासाठी पीएमआरडीएकडून पेठ क्रमांक ११ मध्ये संबंधित जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीने या प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेला मंजुरी दिली. पहिल्या टप्प्याची ई-निविदा दोन कोटी ५३ लाख २५ हजार ४०७ रुपये तर दुसऱ्या टप्प्यात ११७ कोटी अशी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.

या प्रकल्पासाठी महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार महेश लांडगे म्हणाले की, २०१९ मध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या माध्यमातून संविधान भवन उभारणीसाठी पाठपुरावा सुरू केला.

त्यानंतर ‘पीसीएनटीडीए’चे विलिनीकरण पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणामध्ये करण्यात आले. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सदर प्रकल्प लांबणीवर पडला. महायुतीची सत्ता आल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा या कामाला गती देण्यात आली. प्रस्तावित जागा ‘पीएमआरडीए’कडून महानरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा केला. आता संविधान भवन उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे.

Pimpri-Chinchwad Set to Build India's First Constitution Building as Tender Process
Pimpri Crime : काळेवाडीतील हॉटेलमध्ये गुन्हेगाराकडून गोळीबार, माजी नगरसेवकाच्या पिस्तुलाचा केला वापर

इथे असेल संविधान भवन

पिंपरी चिंचवडमधील चिखली प्राधिकरण पेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र होणार आहे. त्यासाठी २५,८९४ चौरस मीटर जागा पीएमआरडीएने २३ जुलै रोजी हस्तांतरित केली. पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीपासून अंदाजे एख किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरीत होवून शहरात संविधान तथा राज्य घटनेचा प्रचार, प्रसार व्हावा. यासह जगभरातील लोकशाही देशाच्या घटनांचा अभ्यास करता यावा, असा संकल्प आहे. संविधान जागृती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली होती. संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये साकारले जात आहे, ही आम्हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.