पिंपरी : नेहरूनगरमधील जम्बो कोविड सेंटर सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. आता तब्बल दोन महिन्यांपासून पगार न झाल्याने कोरोना योद्धांवर चक्क रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. जगावं तरी कसं? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सकाळी सात वाजल्यापासून या जम्बो कोविड सेंटरमधील नर्स, ब्रदर, कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या कंत्राटी नर्से, ब्रदर आणि कर्मचाऱ्यांना गेली दोन महिने पगार दिले गेले नाहीत. या सर्वांना कामावर घेताना एक पगार कपात करण्यात येईल, असं सांगण्यात आले होते . मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पगार न झाल्याने आता नर्स आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जम्बो कोविड सेंटरबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, जम्बो कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे थकीत पगार करण्यासाठी महापालिकेकडून जमा झाला नसल्याची माहिती व्यवस्थापनाकडून मिळाली आहे. (PCMC News)
150 कर्मचारी पगारापासून वंचित
या कोविड सेंटरमधील नर्सेस आणि इतर सपोर्टींग स्टाफने अचानक आंदोलन सुरू केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास 150 कर्मचाऱ्यांरी पगारापासून वंचित आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती मेब्रोस सर्व्हिस या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली होती. परंतु कंपनी जेवढा पगार करारामध्ये ठरला होता. तेवढा देत नसल्याचा या कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या 90 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, या आंदोलनामुळे रुग्णांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे.
सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी नेहरू नगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम मैदानावर महापालिकेने जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. मात्र, सुरुवातीपासून या ना त्या कारणामुळे हे कोविड सेंटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आतापर्यंत जम्बो कोविड सेंटरमध्ये चोऱ्या खूप झाल्या आहेत.रुग्ण बेपत्तादेखील झालेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.