कोरोना संसर्ग कमी झालेला असला तरी हलगर्जीपणा करू नये. त्याबाबतच्या सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हॅंड वॉश करणे, मास्क वापरणे, या नियामांचे पालन करायलाच हवे.
पिंपरी - कोरोना संसर्ग (Corona Infection) कमी झालेला असला तरी हलगर्जीपणा करू नये. त्याबाबतच्या सोशल डिस्टन्सिंग (Social Distencing) पाळणे, हॅंड वॉश करणे, मास्क वापरणे, या नियामांचे (Rules) पालन करायलाच हवे. कोरोनाच नव्हे तर कोणत्याही आजारात व साथरोगाच्या कालावधीत हे नियम गरजेचे झाले आहेत. तीच आता जीवनशैली झाली आहे, असा सल्ला कोरोनाकाळात काम केलेल्या फ्रंट लाइन वर्कर यांनी दिला आहे. कोरोना संसर्ग झालेले पहिले तीन रुग्ण १० मार्च २०२० रोजी शहरात आढळले होते. त्याला गुरुवारी (ता. १०) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची सेवा केलेले डॉक्टर, परिचारिका व सफाई कर्मचारी यांच्याशी प्रातिनिधिक स्वरूपात चर्चा केली. त्या वेळी त्यांनी काळजी घेण्याचा व कोरोना संसर्ग कमी झाला म्हणून बिनधास्त न राहण्याचा सल्ला दिला आहे.
मास्कशिवाय घराबाहेर नाही
‘‘गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात माझ्या आईला कोरोना संसर्ग झाला होता. सीटी स्कोअर दहा होता. ऑक्सिजन पातळी ८७ पर्यंत आली होती. त्यामुळे ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन-तीन हॉस्पिटलला विचारल्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला. पण, इंजेक्शन मिळत नव्हते. एका राजकीय पुढाऱ्याच्या ओळखीने एक इंजेक्शन मिळाले. पहिला डोस दिला. त्यानंतर २४ तासांनी दुसरा डोस द्यायचा होता. सुदैवाने दुसऱ्या दिवशी त्याच हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हिर उपलब्ध झाले.
चौथ्या दिवशी ऑक्सिजन पातळी ९५ पर्यंत पोहोचून आई उठून बसू लागली. आठव्या दिवशी डिस्चार्ज घेऊन घरी आलो. आता ती ठणठणित आहे. वय वर्षे ६३,’’ मोशीतील तरुण सांगत होता. पण, शेजारचा ३५ वर्षांचा मित्र त्याच काळात कोरोनामुळे गेल्याचे दुःख त्याने व्यक्त केले. नको तो कोरोना, असे म्हणत, ‘आता आमच्या घरातील प्रत्येक जण मास्कशिवाय घराबाहेर पडत नाही. स्त गर्दीत जात नाही. इतरांनीही अशीच काळजी घेतली पाहिजे,’ असे आवाहनही त्याने केले.
संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी. हवेतून पसरणाऱ्या साथरोगांसाठी मास्क आवश्यक आहे. पण, कोणताही साथीचा आजार आला, तरी घाबरून जाऊ नये. सरकारकडून व आरोग्य विभागाकडून आलेल्या सूचनांचे पालन करावे. पण, खूपकाही शिकायलाही मिळाले आहे. कोरोनाकाळातील अनुभव पाठीशी घेऊन पुढची वाटचाल करूया!
- डॉ. अभयचंद्र दादेवार, नवीन थेरगाव रुग्णालय
कोरोना संपला आहे, असे समजून बिनधास्त राहू नये. या काळात आपण घेतलेली काळजी व पाळलेले नियम यापुढील काळातही कायमस्वरूपी पाळायला हवेत. सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे नेहमीच असतात. अशी पद्धतीने काळजी घेण्याचे आपल्याला कोरोनाने शिकवले आहे.
- संगीता पाटील, सिस्टर इन्चार्ज
मी वायसीएमच्या आयसीयूमध्ये ड्युटीला होतो. त्यामुळे शेजारी, ‘तुम्हाला काही झाले तर सरकारकडून पैसे मिळतील. आमचे काय?’ यावरून घरच्यांशी वाद घालायचे. माझ्याशी व कुटुंबीयांशी व्यवस्थित बोलत नव्हते. या त्रासाला कंटाळून वाल्हेकरवाडीतील घर विकले. आता चऱ्होलीत राहायला आलो आहे. कोरोनामुळे असे कटू अनुभव आले असले, तरी रुग्णांची सेवा करता आली, हेच भाग्य. आजही ते फोन करून, ‘मामा कसे आहात? तब्येतीची काळजी घ्या’ अशी विचारपूस करतात. त्यांच्यारूपाने नवीन नातेवाईक लाभले आहेत.
- प्रकाश साळवे, सफाई कर्मचारी, वायसीएम रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.