पिंपरी - लॉकडाउनमुळे (Lockdown) अनेकांच्या नोकऱ्या (Job) गेल्या. हातचा रोजगार (Employment) गेला. परिणामी नवविवाहित पती-पत्नीचे (Couple) भांडणे (Disturbance) सुरू झाली. लग्न मोडण्याच्या मार्गावर आले आहे, अशा ५२ जोडप्यांनी तक्रारी (Complaint) अर्ज पोलिसांच्या ‘महिला सेल’कडे (Women Sell) दिले आहेत. विशेष म्हणजे काही जोडपी गेल्याच वर्षी विवाह बंधनात (Marriage) अडकली आहेत. परंतु भरोसा सेलअंतर्गतच्या महिला सहायक कक्षाच्या समुपदेशनामुळे अनेकांचे संसार वाचले आहेत. (Couple want Divorse by Lockdown)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विभक्त होण्याचे वेगळेच कारण समोर आले आहे. कोरोनाची पहिली लाट, दुसरीही लाट आणि आता येणाऱ्या तिसऱ्या लाटेमुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल का? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. या विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी चक्क विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना काळात एकमेकांचा सहवास वाढला तशी भांडणेही वाढली आहेत. संशय घेणे, माहेरच्या मंडळींचा हस्तक्षेप, सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, कोरोनामुळे त्यांची नोकरी गेल्याने आलेले नैराश्यामुळे पत्नीविरोधात तक्रारीची कारणे सर्वाधिक आहेत.
घाईगडबडीत लग्न
पहिल्या लॉकडाउनमध्ये अनेक पालकांनी आपल्या मुलामुलींची लग्न घाई गडबडीत उरकून घेतली. मुलाला चांगली नोकरी आहे, असे सांगत ते गावभर मिरविले, चौकशी केली नाही. पण लॉकडाउन लागताच अनेकांना कंपन्यांनी घरचा रस्ता दाखवला. रोजगाराचा प्रश्न उपस्थित होताच पती-पत्नीत भांडणे सुरू झाल्याचे विदारक चित्र शहरात पाहायला मिळत आहे. त्यात नवविवाहितांचे प्रमाण मोठे आहे.
‘पहिल्या लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावरून चोरून-लपून मित्रमैत्रिणींशी चॅटिंग करणाऱ्या अनेकांची प्रकरणे समोर आली. त्यानंतर सुरू झालेले पती-पत्नीचे भांडण थेट पोलिसांच्या महिला सहायक कक्षापर्यंत येऊन पोहोचले. तक्रार अर्जापैकी ५२ जोडप्यांचे विस्कटलेले संसार समुपदेशन करून पुन्हा फुलवण्याचे काम कक्षाने केले आहे.
२०३ - वर्षभरात तक्रारअर्ज
१ ते ५ - सरासरी दररोज तक्रारअर्ज
७१ - पुरुषांच्या महिलेविरुद्ध तक्रारी
१३२ - महिलेच्या पुरुषांविरूद्ध तक्रारी
१२ - पुरुषांचे अर्ज समझोता
४० - महिलांचे अर्ज समझोता
कोरोनामुळे रोजगारासारखे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मात्र, घाबरून जाऊ नये. आपला संसार टिकून ठेवण्यासाठी लॉकडाउनकडे एक संधी म्हणून पहावे. रोजगाराच्या नव्या वाटा शोधाव्यात. विभक्त होण्यासाठी आमच्याकडे जे पती-पत्नीचे तक्रार अर्ज आले आहेत, त्यांचे संसार टिकवून ठेवण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न आहे.
- मनीषा हाबळे, सहायक पोलिस निरीक्षक, प्रमुख, महिला सहायक कक्ष
तक्रारी अर्ज घेऊन आलेल्या पती-पत्नीचे समुपदेशन करण्याचे काम आम्ही करतो. सध्या लॉकडाउन सुरू असल्याने समुपदेशन करण्यात अडचण निर्माण झाली होती. समुपदेशनाच्या तारखेसाठी संबंधितांना बोलावले जाते. मात्र, त्यांच्या कुटुंबातील कुणीतरी कोविड पॉझिटिव्ह असते, तर कोणाकडे येण्यासाठी पास नसतो, असे असतानाही आम्ही दररोज पाच-दहा जोडप्यांचे समुपदेशन करतो.
- स्वाती रूपनवर, महिला कॉन्स्टेबल महिला सहायक कक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.