पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्यात मागील काही तासात विविध गुन्ह्यांची नोंद झाली.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्यात (Police Station) मागील काही तासात विविध गुन्ह्यांची (Crime) नोंद झाली. यामध्ये घरफोडी, मारहाण, विनयभंग, शस्त्र बाळगणे या गुन्हयांचा समावेश आहे. गुन्हे दाखल करून पोलिसांनी संबंधित आरोपींवर (Accused) कारवाई केली आहे.
तळवडेत सुनेने सासू-सासऱ्याच्या हाताला चावा घेत केली मारहाण
सुनेने सासू-सासऱ्याच्या हाताला चावा घेत मारहाण केली. ही घटना तळवडे येथे घडली. याप्रकरणी शकुंतला प्रकाश परब (वय ६४, रा. गगनगिरी हौसिंग सोसायटी, सहयोगनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्योती श्रीकांत परब हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी ही फिर्यादी यांची सून आहे. ज्योती ही त्यांचा मुलगा सोहम याला मारहाण करीत असताना त्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी हे त्यांचे पती प्रकाश (वय ७४) यांच्यासह ज्योती हिच्या घरी गेले. व त्यांनी सोहम याला ज्योती पासून बाजूला घेतले. याचा राग आल्याने ज्योती हिने फिर्यादी याना शिवीगाळ करून लाथा मारल्या. तसेच फिर्यादी व त्यांच्या पतीच्या हाताला चव घेतला. यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
चाकू बाळगल्याप्रकरणी दापोडीत एकाला अटक
अवैधरित्या चाकू बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई दापोडी येथे करण्यात आली. ओंकार सोमनाथ गायकवाड (वय २०, रा. भाजी मंडई, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे एक कुकरी चाकू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी दापोडतील सिद्धार्थनगर येथील रेल्वे बोगद्याजवळून गायकवाड याला ताब्यात घेऊन चाकू ताब्यात घेतला. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पिंपरीत ५५ हजारांचा ऐवज लंपास
दरवाजाची कडी उघडून घरात शिरलेल्या चोरट्याने ५५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी शेखर विष्णुपंत भोंडे (रा. शुक्रवार पेठ, शनिपार मंडई रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या घराच्या गच्चीवरील दरवाजाला आतून लावलेली कडी कशाच्या तरी सहाय्याने उघडून चोरटा घरात शिरला. एक फोटो पिंटर, ब्लूटूथ हेडफोन, टेनिस रॅकेट, १८ हजार ५०० रुपये किमतीच्या अमेरिकन डॉलर नोटा, एक हजार रुपये किमतीची वेगवेगळी परदेशी नाणी असा एकूण ५५ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
तळवडेत विनयभंग प्रकरणी सावत्र मुलाला अटक
मारहाण करीत विनयभंग केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी सावत्र मुलाला अटक केली. हा प्रकार तळवडे येथे घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सावत्र मुलाला अटक झाली आहे. फिर्यादी या त्यांच्या पतीच्या इच्छेविरुद्ध सातारा येथे औषधोपचारासाठी डॉक्टरांकडे गेल्या होत्या. त्यावरून फिर्यादी या घरी आल्यानंतर आरोपी त्यांना म्हणाला कि, 'तुला पप्पानी घरात घ्यायचे नाही' असे सांगितले. त्यावर फिर्यादी म्हणाल्या कि, ' तुझ्या पप्पांबरोबर मी लग्न केले आहे, ते आणि मी काय आहे ते पाहू' . यावरून आरोपीने त्यांना हाताने मारहाण केली. घरातून बाहेर ओढून घेऊन जात असताना फिर्यादीशी अश्लील वर्तन केले. यामध्ये त्यांचे मंगळसूत्र तुटून नुकसान झाले. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पिंपरीत विवाहतेच्या छळ प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा
विवाहितेचा छळ करून परस्पर दुसरे लग्न केले. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती रवी रमेश जेटीथोर (वय २७), सासरा रमेश नारायण जेटीथोर , सासू मंगल व दीर राकेश (सर्व रा. मु. पो. तीर्थखुर्द, ता. तुळजापूर, जी. उस्मानाबाद ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी याना सह्रीरीव व मानसिक त्रास देत मारहाण केली. तसेच पतीने फिर्यादी पत्नीसह त्यांच्या मुलीच्या पालन पोषणाची जबाबदारी न घेता, सांभाळ न करता एकटाच गावी गेला. व दुसरे लग्न केले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.