पिंपरी - कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शासनाने (Government) घालून दिलेल्या नियमांचे (Rules) उल्लंघन करीत भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landage) यांनी लेकीच्या मांडव टहाळ्याचा कार्यक्रम (Event) जल्लोषात साजरा (Celebration) केला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांसमवेत केलेला डान्स (Dance) आमदार महेश लांडगे यांना भोवला असून आमदारांसह साठ जणांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (Crime on MLA Mahesh Landage with 60 Activists)
महेश लांडगे यांच्यासह त्यांचे बंधू सचिन किसनराव लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, अजित सस्ते, राहुल लांडगे, दत्ता गव्हाणे, गोपी कृष्ण धावडे, सुनील लांडे, नितीन गोडसे, प्रज्योत फुगे (सर्व रा. भोसरी) यांच्यासह पन्नास जणांवर गुन्हा दाखल आहे. महेश लांडगे यांची मुलगी साक्षी हिचे ६ जूनला लग्न आहे. यानिमित्ताने भोसरीतील लांडगे आळी येथील त्यांच्या घरासमोरील महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन येथे रविवारी (ता. ३०) सायंकाळी सचिन लांडगे यांनी मांडव टहाळ्याच्या कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये आमदारांसह साठ जण परवानगी नसताना एकत्र जमले. विनमास्क, सामाजिक अंतर न पाळता वाद्य वाजवून नृत्य केले. कोरोना विषाणूचा आणखी प्रसार होईल व लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केले. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन न करता कोरोनाचा संसर्ग पसरण्याची जाणीव असतानाही जमाव जमविणे, शासकीय आदेशाचा भंग करणे, तसेच पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.