Talegaon Crime News : तळेगाव पोलीसांकडून चोरीच्या १९ दुचाकी हस्तगत

तळेगाव दाभाडे परिसरातून चोरीस गेलेल्या एकोणीस दुचाकी पालघर,इगतपुरी येथुन हस्तगत करीत तळेगाव दाभाडे पोलीसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
crime update Talegaon police seized 19 stolen bikes
crime update Talegaon police seized 19 stolen bikes Sakal
Updated on

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे परिसरातून चोरीस गेलेल्या एकोणीस दुचाकी पालघर,इगतपुरी येथुन हस्तगत करीत तळेगाव दाभाडे पोलीसांनी एका आरोपीस अटक केली आहे.

दुचाकी चोरीस प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गेल्या ४ डिसेंबरला दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपी आणि वाहनाचा शोध घेत असतांना तपास पथकातील पोलीस अंमलदार हर्षद कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्हयात चोरीस गेलेले वाहन यशवंतनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उभे आहे.

माहीती मिळाल्यानंतर तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खामगळ आणि पोलीस हवालदार कोकतरे हे तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले.तेथे उभ्या असलेल्या दुचाकी वाहनाबाबत आजुबाजुस चौकशी केली असता, सदर वाहन हे इसम नामे उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे याने तेथे उभे केलेले असल्याबाबत समजले.

त्यावरून नमुद इसमाबाबत माहीती काढुन त्यास मारूती मंदीर चौकातून ताव्यात घेण्यात आले.त्याला विश्‍वासात घेत त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली.

तळेगाव दाभाडे त्याने हद्दीतुन इतरही दुचाकी वाहने चोरुन ती वाहने त्याचा साथीदार नामे लालु सखाराम मेंगाळ (कॉलनीवाडी इंदोरे, ता.इगतपुरी,नाशिक) याच्या मदतीने नाशिक जिल्हयातील इगतपुरीसह पालघर जिल्हयातील मोखाडा भागात विकी केल्याचे सांगितले.

त्यावरून तळेगाव दाभाडे पोलीसांनी परिसरातील वेगवेगळया ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासुन आरोपीने दिलेल्या कबुलीप्रमाणे खात्री केली.आरोपीला सोबत घेऊन पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खामगळ यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने नाशिक आणि पालघर जिल्हयात छापे मारले.

दरम्यान इगतपुरी येथुन १०, मोखाडा येथुन ४ तसेच तळेगाव दाभाडे परिसरातून ०५ याप्रमाणे एकुण १९ दुचाकी वाहने अंदाजे किंमत चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपी नामे उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे (४०,तळेगाव दाभाडे,मावळ,पुणे) याला पोलिसांनी अटक केली असून,पुढील तपास चालू आहे. सहायक पोलीस आयुक्‍त, देहरोड विभाग श्री. देवीदास घेवारे सो. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख रविंद्र खामगळ,कदम, पोहवा कोकतरे,पोलीस अंमलदार कदम, सगर, ओव्हाळ, मोहीते, झेंडे, मदने आदींनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()