पिंपरी : पैसे काढण्यासाठी सेवा विकास बँकेत गर्दी

खातेदारामध्ये भीती, संताप अन वाद मोठा गैरव्यवहार समोर आल्याचा परिणाम
पिंपरी : पैसे काढण्यासाठी सेवा विकास बँकेत गर्दी
Updated on

पिंपरी : पिंपरीतील (pimpri) दि सेवा विकास को ऑप. बँकेत (seva vikas bank) कर्ज वाटपात ४२९ कोटी ५७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे मागील आठवड्यात समोर आले. याप्रकरणी तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी, कर्जदारांसह तब्ब्ल ३७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बँक बंद होणार या अफवेने व भीतीने इतर खातेदारांनी पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी केली. पिंपरीतील (pimpri) मुख्य शाखेत दोन दिवसांपासून खातेदारांच्या रांगा लागत आहेत. शनिवारीही (ता. २०) बँकेसमोर मोठी गर्दी होती.

दि सेवा विकास बँकेच्या एकूण २५ शाखा असून एक लाखाहून अधिक खातेदार आहेत. दरम्यान, सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) राजेश उद्धवराव जाधवर यांनी बँकेतील पन्नास लाखांवरील कर्ज प्रकरणाचे लेखापरीक्षण करून ६ ऑगस्टला अहवाल सादर केला असता यामध्ये बँकेकडून झालेल्या कर्ज वाटपात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणात आरोपींवर फसवणुकीसह विविध कलमांतर्गत पिंपरी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले असून, उर्वरित प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पिंपरी : पैसे काढण्यासाठी सेवा विकास बँकेत गर्दी
अफगाणिस्तान जिंकलं, पण पंजशीरमध्ये तालिबानचं काय होणार?

यापूर्वीही बँकेतील विविध तक्रारींवरून अद्यापपर्यंत चौदा गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, आता मोठा गैरव्यवहार समोर आल्यानंतर बँकेवर कारवाई होणार असून बँक बंद होणार असल्याची अफवा खातेदारांमध्ये पसरली. यामुळे भीतीपोटी खातेदारानि पैसे काढणासाठी शुक्रवारी (ता. १९) व शनिवारी (ता. २०) मोठी गर्दी केली होती. बँकेबाहेर रस्त्यावर लांबपर्यंत रांग लागली होती. प्रवेशद्वारातून आत सोडत नसल्याने खातेदारांचे बँक कर्मचाऱ्यांशी वादाचे प्रकार घडले. तसेच मर्यादितच रक्कम मिळत असल्याने खातेदार संताप व्यक्त करीत होते.

दरम्यान, माझे येथे खाते असून रक्कम काढायची आहे. मात्र, बँकेतून मर्यादितच रक्कम देत आहेत. एटीएम, नेट बँकिंगही बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे खातेदार अजित कंजवानी म्हणाले.

पिंपरी : पैसे काढण्यासाठी सेवा विकास बँकेत गर्दी
गजानन काळेंचा जामीन फेटाळाला, पत्नीची कृष्णकुंजवर धाव

अनेक वर्षे पतीसमवेत चहाची टपरी चालवून साठवलेले पैसे या बँकेत ठेवले आहेत. वयोमानाने आता काम करता येत नाही. तरुण मुलाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. कमवता मुलगा गेल्याने आता बँकेतील पैशांवरच आम्ही अवलंबुन आहोत. अशातच बँक बंद होणार असल्याची समजल्याने पैसे काढणासाठी सकाळपासून दोनदा येऊन गेले. मात्र, गर्दी असल्याने आत तिसऱ्यांदा आले.

- कविता, खातेदार.

बँकेचे सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. आरबीआयकडून कसलेही निर्बंध आलेले नाहीत. जसे पैसे उपलब्ध असतील तसे पैसे देत आहोत, कोणालाही नाही म्हटलेले नाहीत. खातेदारांनी घाबरून जाऊ नये. एटीएम, नेटबँकिंगही बंद केलेले नाहीत.

- सीमा शर्मा, व्यवस्थापिका, मुख्य शाखा, पिंपरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.