दापोडी रेल्वे स्टेशन सर्व्हर रूमला आग; रेल्वे वाहतूकीवर परिणाम

दापोडी रेल्वे स्टेशन ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक सर्व्हर रूमला आग लागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन बंबांनी आग विझवली. मात्र, रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे.
Fire
FireSakal
Updated on
Summary

दापोडी रेल्वे स्टेशन ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक सर्व्हर रूमला आग लागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन बंबांनी आग विझवली. मात्र, रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे.

जुनी सांगवी - दापोडी रेल्वे स्टेशन (Dapodi Railway Station) ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक सर्व्हर रूमला (Server Room) आग (Fire) लागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन बंबांनी आग विझवली. मात्र, रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे.

आगीच्या घटनेमुळे नांदेड पनवेल एक्सप्रेसला एक तास उशिर झाला. दापोडीत नांदेड एक्स्प्रेस सिग्नल अभावी अडकून पडली होती. स्टेशनच्या मागील बाजूस वाहतूकदिवे नियंत्रण रिले रूमला आग लागल्याने दापोडी ते पिंपरी मार्गावरिल सर्व सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. स्थानिक नागरिक रहिवाशी यांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळवून पाचारण करण्यात आले. यामुळे लोकल वाहतूकीवर ही याचा परिणाम होणार आहे. यावेळी पुणे विभागीय रेल्वे बोर्ड सदस्य विशाल वाळुंजकर घटनास्थळी उपस्थित होते. रेल्वे कडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

Fire
भोसरीत तरुणाचा गळा आवळून खून; जीपमध्ये आढळला मृतदेह

या घटनेमुळे दोन पुणे लोणावळा लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. तर सिग्नल अभावी ईतर गाड्यांना उशीर झाला. दापोडी ते पिंपरी मार्गावरील सिग्नल दिवे बंद पडले आहेत. रेल्वेच्या रेणु शर्मा मुख्य विभागीय व्यवस्थापक व रेल्वे अधिकारी मिलिंद वाघोलिकर, शाम कुलकर्णी डीसीआरएम यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी करत पाहणी केली. आगीचे कारण शोधण्यासाठी समिती तर्फे चौकशी समिती नेमण्यात आली असल्याचे अधिका-यांना डून सांगण्यात आले. तर दुरूस्तीचे काम सुरू आहे. लवकरात लवकर पूर्ववत व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे अधिका-यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.