देहू - इंद्रायणी काठी तुकाराम महाराज बीज सोहळा पडला पार

dehu indrayani tukaram maharaj beej sohala 2021
dehu indrayani tukaram maharaj beej sohala 2021
Updated on

देहू : टाळमृदंगाचा गजर आणि तुकोबा तुकोबाच्या नामघोषात मंगळवारी (ता.30) देहूतील इंद्रायणी नदीकाठी संत तुकाराम महाराज बीज सोहळा परंपरेनुसार आणि शासनाच्या आदेशानुसार पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश पाळत, लवकरात लवकर कोरोनापासून साऱ्या विश्वाला मुक्ती मिळावी, अशी मागणी उपस्थित वारकऱ्यांच्यावतीने विठू चरणी करण्यात आली. लाखो भाविकांच्या संख्येने साजरा होणारा बीज सोहळा यंदा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला, मात्र उत्साह तोच होता. ''सकळिकांचे समाधान /नव्हे देखिल्यावांचून१ // रुप दाखवी रे आता /सहस्त्रभुजांच्या मंडिता२// शंखचक्रपद्यगदा/ गरुडासहित ये गोविंदा३// तुका म्हणे कान्हा/भूक लागली नयनां४ //'' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओव्याप्रमाणे वैष्णव भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी हा वैकुंठगमन सोहळा अनुभवला.

सदेह वैकुंठगमनाची वेळ जशी जवळ येत होती तशी टाळमृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोषाने वैकुंठगमन मंदिर परिसर दुमदुमले. उपस्थित भाविकांनी वैकुंठगमन सोहळ्याची वेळ होताच दुपारी साडेबारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी यंदा कोरोनामुळे 50 भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाड्यात पहाटे तीन वाजता काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता श्रींची महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे,विश्वस्त माणिक महाराज मोरे,संजय महाराज मोरे,विशाल महाराज मोरे,अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, भानुदास महाराज यांच्याहस्ते झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापुजा संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, माजी विश्वस्त विश्वजीत मोरे यांच्याहस्ते झाली. पहाटे साडेपाच वाजता वैकुंठस्थान मंदिरात संत तुकाराम महाराजांची महापुजा अध्यक्ष मधुकर महाराज मोरे,संजय महाराज मोरे,भानुदास मोरे, विशाल महाराज यांच्या हस्ते झाली. सकाळी साडेदहा वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका भजनी मंडपातील फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या.परंपरेनुसार सेवेकरी मानकरी टिळेकर,पवार,भिंगारदिवे,तांबे,कांबळे,थोरात,गायकवाड,पांडे सेवेला उपस्थित होते.त्यानंतर पालखी वैकुंठस्थान मंदिराकडे मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराजांच्या पालखीपुढे सनई चौघडे,ताशे,नगारे,अब्दागिरी आणि टाळकरी होते. पालखीपुढे मानाची कल्याणकरांची दिंडी होती. वैकुंठस्थान मंदिरासमोर संस्थानचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ किर्तनकार बापूसाहेब मोरे यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यावरील "घोटविन लाळ ब्रम्हज्ञानी हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविण, ब्रम्हभुतकाया होतसे किर्तनी,भाग्यतरी ऋणी देव ऐसा/" या अभंगावर किर्तन झाले.

'कोरोना प्रतिबंधासाठी सुक्ष्म नियोजन करा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे झेडपीला आदेश

दुपारी साडेबारा वाजण्याची वेळ जसजशी जवळ येवू लागली तशी तुकाराम तुकाराम नामाचा जयघोष गजर सुरु झाला. उपस्थित भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. वैकुंठस्थान मंदिरात संस्थानचे अध्यक्ष मधूकर महाराज मोरे ,विश्वस्त विशाल महाराज मोरे,खासदार श्रीरंग बारणे,पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याहस्ते आरती झाली. यावेळी अतिरिक्त पोलिस रामनाथ पोकळे,उपायुक्त आनंद भोईटे, प्रांताधिकारी सचिन बारवकर, अप्पर तहसिलदार गिता गायकवाड,मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे, पोलिस निरिक्षक विलास सोंडे,माजी विश्वस्त दिलीप महाराज मोरे,जिल्हा परिषद सदस्य शैला खंडागळे, व इतर उपस्थित होते. आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्य देऊळवाड्याकडे आगमन झाले.

चोख पोलिस बंदोबस्त
संचारबंदी आदेशाचे कोठेही उल्लंगन होवू नये यासाठी देहूच्या चारही प्रवेशद्वाराजवळ चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ग्रामस्थांनीही पोलिसांना साथ दिली.गावातील जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती.रस्ते ओस होते. दरवर्षी बीजेसाठी लाखोच्या संख्येने भाविक असतात.मात्र यंदा पालखी मार्ग,इंद्रायणी नदीचा काठ भाविकां विनाच होता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()