कामगार उपायुक्तांचे बांधकाम व्यावसायिकाला काम बंद करण्याचे आदेश

तरुण कामगाराचा काम असताना चौथ्या मजल्यावरून पडुन दुर्दैवी मृत्यु
worker
workersakal
Updated on

पिंपरी : आकुर्डी गावठाण येथील मयुर समृद्धी (बंटी गृप) या बांधकाम प्रकल्पावर मुन्ना धरमदेव महतो ( वय २१) या तरुण कामगाराचा काम असताना चौथ्या मजल्यावरून पडुन दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी कामगार उपायुक्तांनी बांधकाम व्यावसायिकाला काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पतित पावन कामगार महासंघाने पाठपुरावा केला होता.

worker
पिंपरीत दोन कुटुंबात हाणामारी

या बांधकाम प्रकल्पावर १२ जुलै २०२१ रोजी ही घटना घडली होती. बांधकाम व्यावसायिकाविरोधात निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे. पतित पावन कामगार महासंघाने १५ जुलै २०२१ रोजी या घटनेची माहिती कामगार उपआयुक्त कार्यालयाला देत तक्रार नोंदविली होती. या तक्रारीची दखल घेत कामगार उपआयुक्त अभय गीते यांनी घटनास्थळी पाहणीचे आदेश दिले. या आदेशानुसार सरकारी कामगार अधिकारी आत्तार मॅडम यांनी पाहणी करून अहवाल सादर केला. या पाहणीत बांधकाम करताना सूरक्षा बेल्ट, वॉटरप्रुफ बूट, पुरेशी सुरक्षा दोरी, जॅकेट, हेल्मेट, हातमोजे पूरविल्याचे आढळून आले नाही. धोकादायक खडडे व सुरक्षा कठडा पट्टी व जाळी लावलेली नाही. त्यामुळे कामगार कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. या अहवालानुसार धोक्याचे कारण दीर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येईपर्यत कामगार उपआयुक्त श्री. गीते यांनी सदर अपघाती प्रकल्पाला काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

worker
नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन

मुंबई कार्यालयात सुध्दा मृत्यु पडलेल्या कामगारास न्याय मिळवून देण्याचा पुर्ण प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारची कारवाई गेल्या अनेक वर्षांनंतर झालेली आहे. मृत कामगाराच्या वारसांना श्रमिक अधिनियम १९२३अंतर्गत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्व मदत पतित पावन कामगार महासंघातर्फे करण्यात येणार आहे. अशा कारवाई नंतरच बांधकाम व ठेकेदार हे कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन मृत्यु पडण्याचे प्रमाण कमी होणार आहे. पतित पावन कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजय गवळी, राज्यकार्याध्यक्ष राजेश मोटे, पतित पावन कामगार महासंघाचे शहराध्यक्ष लक्ष्मण वैरागे, सरचिटणीस सचिन गुंजाळ यांनी पाठपूरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.