Diwali Pahat 2023 : वाकडमधील दिवाळी पहाटला रसिक श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

बेला शेंडे, सहगायकांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध
Diwali Pahat 2023
Diwali Pahat 2023Sakal
Updated on

वाकड : कस्पटे वस्ती येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानात पहाटेच्या प्रसन्न व शांत वातावरण सालाबादप्रमाणे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे व राहुल सक्सेना व सौरभ दफ्तरदार हे उभरते गायक तसेच पराग माटेगावकर यांच्यासह सर्व वादकांच्या साथीने दिवाळी पहाट हा सुश्राव्य व सुुमधुर गाण्यांंचा कार्यक्रम धनोत्रयोदशीच्या मंगल दिनी शुक्रवारी (ता. १०) संगीताची सुरेल मैफिल संपन्न झाली.

माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी आयोजित केलेल्या या मेहफलीत परिसरातील सुमारे दोन हजार रसिक श्रोत्यांनी या सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. प्रभात समयी सूर-तालात अक्षरश: रसिकांना न्हाऊ घालत मने प्रसन्न करत खिळवून ठेवले. राहुल सक्सेना यांनी भक्ती गीताने सुरुवात केली.

लता दिदींचे "मेरी आवाजही पहेचान है! हे गीत बेला शेंडे यांनी हृदयद्रावक आवाजाने रसिकांची मने हेलावली. त्यानंतर आता जाऊ द्या ना घरी ही लावणी राहुल-सौरभ यांच्यासह कोरसमध्ये सादर केली. केंव्हा तरी पहाटे" हे यमन रागावर आधारित गीत सहजतेने गायले.

यावेळी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा ममता गायकवाड, आरती चौंधे, मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चौंधे, प्रदेश महिला मोर्चाच्या सदस्या प्रा. भारती विनोदे, सचिन साठे, धनराज बिर्दा,

रणजित कलाटे, शिरिष साठे, सचिन लोंढे, मुकुंद डमकले, अरुण देशमुख, संदिप नखाते, रामदास कस्पटे, श्रीनिवास मानकर, विनोद कलाटे, वैशाली मरळ, आकाश शुक्ला, म्हातु वाकडकर, विष्णुपंत कस्पटे, मोतीलाल ओसवाल, पोपटराव कस्पटे, हनुमंत कस्पटे यांच्यासह वाकड, विशालनगर, पिंपळे सौदागर, थेरगाव परिसरातील रसिक व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आम्ही ठाकरं, ठाकरं या रानाची पाखरं ! हे सौरभ दफ्तरदार यांनी गायिलेले गीत खास भावलं. राहुल यांच्या कट्यार काळजातमधील "या भवनातील पुराणे व "अवघी नादावली पंढरी" या विठ्ठल नामाच्या भजनाने सांगता झाली. संदीप कस्पटे हे आपल्या कार्यक्षमतेतून गुणवत्तेचे सातत्याने दर्शन घडवितात त्याला हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील अपवाद नाही अशा शब्दात निर्माते पराग माटेगावकर यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.