Amol Kolhe: 'ही तर तत्त्वांची लढाई..' अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात नाव न घेता डॉ. अमोल कोल्हे यांचा हल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्याच बालेकिल्ल्यात नाव न घेता हल्ला
dr amol kolhe jayant patil criticize ajit pawar ncp assembly election 2023 live update politics
dr amol kolhe jayant patil criticize ajit pawar ncp assembly election 2023 live update politics Esakal
Updated on

Bhosari News : अनेकजण सांगतात विकासासाठी पक्षांतर केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला औरंगजेबापुढे मान तुकवली असती तर कदाचित त्यांना दख्खनची सुभेदारी मिळाली असती.

मात्र त्यांनी तत्त्वाला न सोडता ताठमानेने जगण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ही लढाई भौतिक सुखाची नाही तर तत्त्वांची आहे असे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्याच बालेकिल्ल्यात नाव न घेता हल्ला केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. डाॅ. कोल्हे पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातला पूर्ण पाण्याचा कोठा संपल्यानंतरही ८०-९० टक्के जमीन ओलिताखाली येणार नाही.

त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांच्या रोजगारांची सोय व्हावी यासाठी एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. पिंपरी-चिंचवड आयटी पार्क आणि एमआयडीसीच्या माध्यमातून शरदचंद्र पवारसाहेबांनी पिंपरी-चिंचवड शहराचे इकोनाॅमिक इंजिन सेट करण्यास हातभार लावला.

शहराच्या विकासात जेएनएनयूआरएमचा फार मोठा वाटा आहे. पिंपरी-चिंचवडच्या विकासाठी जेएनएनयूआरएमच्या फंडासाठी दिल्लीतून दारे उघडण्याचे काम शरदचंद्रजी पवारसाहेबांनी केले.” महापालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत.

यावर कोल्हे म्हणाले, “दोन वर्षे झाली नागरिकांच्या समस्यासाठी महापालिकेत नागरिकांच्या प्रतिनिधींना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. फक्त प्रशासकच निर्णय घेऊ शकतो. यामध्ये नेमकं कोणाचं भलं होत आहे ? हा प्रश्न प्रत्येकाने विचारणे गरजेचे आहे.”

dr amol kolhe jayant patil criticize ajit pawar ncp assembly election 2023 live update politics
Pune News : अजित पवारांचे आरोप बेदखल, तर पटेलांना टोला; शरद पवारांच्या निशाण्यावर बंडखोर नेते

पिंपरी विधानसभेचा उमेदवार ठरला

पिंपरी विधानसभेविषयी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “मागच्या विधासभेला सुलक्षणा धर-शिलवंत यांना पिंपरी-विधानसभेचे मिळालेले तिकीट नंतर बदलण्यात आले होते. तरी निष्ठेने आज त्या पक्षाबरोबर आहेत. त्यामुळे पिंपरी विधानसभेच्या उमेदवारासाठी आम्हाला शोध घेण्याची गरज नाही. मात्र कोणी इच्छुक असेल तर भेटा. ”

सभेला येणे गरजेचेच होते- डाॅ. कोल्हे

खासदार डाॅ. अमोल कोल्हे हे सभास्थानी रात्री पावणेनऊच्या सुमारास उशिरा पोचले. तेव्हा दिलगिरी व्यक्त करत ते म्हणाले, “आजच्या सभेला येणे गरजेचेच होते. कारण सध्या राजकारणामध्ये सुरू असलेल्या उलथापलथीमुळे मी सभेला आलो नाही, तर प्रसार माध्यमात मी राष्ट्रवादी काग्रेसबरोबर (शरद पवार गट) आहे का नाही यावर चर्चा सुरू होते.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.