पिंपरी : अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरल्यानंतर सोमवारपासून (ता. २३) संस्थांतर्गत (इनहाऊस), व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि अल्पसंख्याक (मायनॉरिटी) कोट्याअंतर्गच्या प्रवेशास सुरुवात झाली आहे. या प्रवेशासाठी १२ टक्के आरक्षण एसईबीसी आणि १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळणार आहे. त्यामुळे चांगले गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात नक्कीच प्रवेश मिळणार आहे. मंगळवारपर्यंत (ता. २४) विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्याअंतर्गतचे प्रवेश पूर्ण करायचे आहेत. विविध कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी केंद्राबाहेर तुरळक विद्यार्थी पहावयास मिळाली.
शहरात ८० विविध शाखांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी सर्वच कनिष्ठ महाविद्यालयात इनहाऊस प्रवेश कोटा आहे. यापैकी सुमारे २० महाविद्यालये ही अल्पसंख्याक आहेत, तर उर्वरित वरिष्ठ माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये ही बिगर अल्पसंख्याक आहेत. तेथे इनहाऊस कोटा लागू होतो. सध्या या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा इनहाऊस कोटा २० टक्के आरक्षित केला आहे. त्यानुसार अकरावीचे प्रवेश दिले जातात. ही आरक्षणाची पद्धत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जुन्या काळापासून आहे. तसेच, या कनिष्ठ महाविद्यालयांशी झालेल्या चर्चेअंती हे २० टक्के आरक्षण यंदापासून १० टक्के केले आहे. त्यामुळे एसईबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इनहाऊस १० टक्के आरक्षण लागू झाले आहे. अपंग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के जागा राखीव होत्या. हे प्रमाण आता चार टक्के केले आहे.
पहिल्या फेरीची यादी शुक्रवारी
कोरोनामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा उशिरा सुरू झाली. आता पहिल्या फेरीची यादी शुक्रवारी (ता. २७) लागणार असून, ते प्रवेश घेण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. ३०) सुरू राहणार आहेत. नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील. विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील. नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील, असे केंद्रीय समितीने कळविले आहे.
२०२०-२१चा पहिल्या फेरीचा कटऑफ
कनिष्ठ महाविद्यालये कला वाणिज्य विज्ञान
राजमाता कॉलेज भोसरी ३७० ३८० ४२२
कॅम्प एज्युकेशन निगडी ३३१ ३३६ ४२८
गेंदीबाई चोपडा चिंचवडगाव २३० ३३२ ०
प्रतिभा कॉलेज चिंचवड स्टेशन ३२० ४०९ ४५९
अमृता कॉलेज निगडी ० ४५६ ४६२
डॉ. डी. वाय. पाटील पिंपरी ३२० ४०९ ४५९
ताराबाई मुथा कॉलेज चिंचवडगाव ० ३६९ ४४१
एस. बी. पाटील रावेत ० ३३३ ३६३
कमलनयन बजाज संभाजीनगर ० ० ४६९
अभिषेक कॉलेज संभाजीनगर ० २८२ ३७०
निर्मल बेथानी काळेवाडी ० ३४३ ४३३
सेंट उर्सुला आकुर्डी ० ४४८ ४५८
सेट ॲन्स निगडी ० ३४० ३९१
मॉडर्न कॉलेज निगडी ० ३७३ ४१०
एम. एम. कॉलेज काळेवाडी ० ३३६ ३५६
अजमेरा कॉलेज मासुळकर कॉलनी ० ३७५ ४२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.