आता फेसबुक अकाउंट हॅकचा फंडा; अधिकारी, पदाधिकारी टार्गेट

वैद्यकीय उपचारासाठी पैशांची गरज होती, अपघात झाला आहे, अर्जंट पैसे पाठवा, असे मेसेज बनावट फेसबुक अकाउंटवरून पाठवून पैसे उकळण्याचे प्रमाण वाढत आहे.
Facebook Fraud
Facebook FraudSakal
Updated on

पिंपरी - वैद्यकीय उपचारासाठी (Medical Treatment) पैशांची गरज (Money Demand) होती, अपघात (Accidnet) झाला आहे, अर्जंट पैसे पाठवा, असे मेसेज बनावट फेसबुक अकाउंटवरून (Facebook Fake Account) पाठवून पैसे उकळण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी अधिकारी, (Officer) पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या अकाउंटचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे. (Facebook Account Hack Funda Officer Target Cyber Crime)

ऑनलाइन माध्यमातून नागरिकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढत आहे. फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून त्याद्वारे लोकांकडून पैसे मागितले जात आहेत. या बाबतच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात. मात्र, आता तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच नावाचे बनावट फेसबुक खाते उघडल्याचे समोर आले आहे. सायबर गुन्हेगारीचा फटका खुद्द पोलिस आयुक्तांसह अधिकाऱ्यांना बसला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये पिंपरी - चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनवून यूजर्सकडे पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच आता महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून लोकांकडून पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Facebook Fraud
लग्नास होकार न मिळाल्याने तरूणाची आत्महत्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे २०२० मध्ये अशा प्रकारच्या ७८ तक्रारी प्राप्त झाल्या तर चालू वर्षात जानेवारीपासून अद्याप ३२ तक्रारी आल्या आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील तक्रारदारांचा समावेश आहे.

फेसबुकवर बनावट खाते तयार करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी फेसबुकसह इतर सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. संपूर्ण तांत्रिक माहिती असेल तरच सोशल मीडिया वापरावा. तसेच फेसबुकसह इतर सोशल मीडियावर नवीन अकाउंट तयार करताना संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीची संबंधित कंपनीकडून खातरजमा होणे आवश्यक आहे.

- संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

काय काळजी घ्यावी

  • वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर अपलोड करू नये

  • फोनवरून प्रत्यक्ष बोलून खात्री केल्याशिवाय पैसे पाठवू नये

  • प्रोफाईलमधील माहिती ओळखीच्या, जवळच्या व्यक्तींनाच दिसेल अशी सेटिंग करावी

  • ॲपची संपूर्ण तांत्रिक माहिती हवी

  • अधिकाऱ्यांनी त्यांचे गणवेशातील फोटो, पदाबाबतची माहिती सोशल मीडियावर अपलोड करू नये

Facebook Fraud
खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून उकळले तब्बल ६ कोटी

सोशल मीडिया वापरताना सावधानता बाळगावी

सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा. त्याचा गैरवापर होणार नाही, याबाबत अधिक जागृत राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

महापालिका आयुक्त पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून अज्ञात व्यक्तीने नागरिकांकडून पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या व्यक्तीने पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठवून अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. बनावट फेसबुक अकाउंटचा प्रकार लक्षात येताच महापालिकेचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांनी पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली आहे. आयुक्त पाटील म्हणाले, ‘‘कोणीतरी हा खोडीलपणा केला आहे. पण, कायद्यानुसार तो गुन्हा आहे. त्याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. सोशल मीडिया वापरताना नागरिकांनी सावध रहायला हवे.’’ दरम्यान, महापालिका आयुक्तांच्या नावाने तयार केलेले बनावट फेसबुक अकाउंट बंद केले आहे. याबाबत फेसबुककडून माहिती मागविली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

तक्रारी

  • ७८ - १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२०

  • ३२ - १ जानेवारी ते ७ जून २०२१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.