Pune Flood Viral Video: ओढ्याचा प्रवाह चिरत कारजवळ पोचले अन्.. प्रसंगावधानाने वाचवले कोहली पिता-पुत्राचे प्राण

Car in flood water: बापलेकाची चार चाकी चऱ्होलीतील भोसले वस्तीजवळील डी. वाय. पाटील रस्त्याजवळील इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या ओढ्याच्या प्रवाहात सापडून वाहत गेली.
Car in flood water
Car in flood watersakal
Updated on

भोसरी - हरिद्वारवरून आळंदीतील इंद्रायणी रुग्णालयात कर्करोगावर उपचार करण्यासाठी आलेल्या बापलेकाची चार चाकी चऱ्होलीतील भोसले वस्तीजवळील डी. वाय. पाटील रस्त्याजवळील इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या ओढ्याच्या प्रवाहात सापडून वाहत गेली. चऱ्होलीतील सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी प्रसंगावधान वेळीच त्यांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले.

Yogesh Bhosale, Rajesh Kohli and Tushar Kohli
Yogesh Bhosale, Rajesh Kohli and Tushar Kohlisakal

हरिद्वार येथे राहणारे राजेश कोहली यांना कर्करोग झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी त्यांचा मुलगा तुषार कोहली यांनी आळंदीतील इंद्रायणी रुग्णालयाची गुरुवारची (ता. २५) भेटण्याची वेळ घेतली होती. तेव्हा ते हरिद्वारवरून कारने आळंदीच्या दिशेने निघाले होते.

चऱ्होलीतील भोसले वस्ती डी. वाय. पाटील रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून त्यांची कार ओढ्याच्या प्रवाहाला लागल्याने वाहून जात होती. सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी प्रसंगावधान राखत ओढ्याचा प्रवाह चिरत कारजवळ पोचले. तोपर्यंत ओढ्याजवळ बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र पाण्याचा प्रवाह पाहून कोणीही कोहली आणि भोसले यांच्या मदतीला धावले नाहीत.

इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या या ओढ्याला पुढे दहा ते वीस फूट खोल खड्डा होता. जर कोहली यांची कार पुढे वाहत गेली असती तर त्यांना वाचविणे अवघड झाले असते. त्याचप्रमाणे कार आणखी खोल पाण्यात गेली असती, तर ती लॉक होऊन त्यांना वाचविण्यात अडचण आली असती. या धोक्याची कल्पना आल्याने भोसले यांनी जीवाची परवा न करता ओढ्याच्या प्रवाहात कारच्या दिशेने गेले.

नशीब बलवत्तर म्हणून भोसले यांनी घराकडे ये-जा करण्यासाठी बांधलेल्या आणि पाण्याखाली गेलेल्या पुलाला कोहली यांची कार अडकून थांबली. राजेश यांना बाहेर काढत असताना ते पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेले. मात्र प्रसंगावधान राखत भोसले यांनी त्यांचा हात घट्ट धरून प्रवाहाच्या बाहेर काढले. भोसले यांनी कोहली यांचा घरी पाहुणचारही केल्याने राजेश कोहली आणि तुषार कोहली पाहुणचाराने भारावून गेले. या घटनेनंतर हा रस्ता प्रवासासाठी बंद करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.