करंजगाव : नाणे मावळात संततधार पाऊस व ऊन यामुळे कधी गारवा तर कधी तीव्र उकाडा असे वातावरण आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने थंडी, ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, जुलाब अशा आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचीची भीती नागरिकांच्या मनात असल्याने अनेकांना आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असावा, अशी भीती मनामध्ये निर्माण होत आहे.
दरम्यान, सतर्कतेमुळे अनेक नागरिक कोरोनाचाची चाचणी करून घेत आहेत, तर अनेक जण भीतीपोटी आपल्याला दवाखान्यात जाऊन कोरोनाचा संसर्ग होऊ नये, या हेतूने हे आजार अंगावर काढत आहेत. नागरिकांमध्ये कोरोनाचाच संसर्ग ही धास्ती निर्माण होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता जाणवत असलेल्या लक्षणांवरून आपणास असलेल्या आजाराचे निदान करणे गरजेचे आहे.त्याकरिता डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून खरोखरच कोरोनाचा संसर्ग असेल तर त्यावर वेळेत उपचार होऊन इतरांना संसर्गापासून वाचवता येईल.- डॉ. अनिल गिरी, वैद्यकीय अधिकारी, कामशेत
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.