महिलांनी साकारल्या रामायणातील स्त्री व्यक्तिरेखा

कोविडच्या परिस्थितीत स्त्री वर्गात सकारात्मकता जागरूक ठेवणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमादरम्यान काही जणी क्वारंटाइन असूनही सहभागी झाल्या.
Ramayan
RamayanSakal
Updated on

पिंपरी - ‘रामायणातील स्त्री व्यक्तिरेखा’ या कार्यक्रमाअंतर्गत रामायणातील (Ramayan) स्त्रिया (Women) विविध रूपात कशा प्रभावी होत्या आणि त्यांनी विशिष्ट गुणांमुळे इतरांना कसे प्रभावित (Affected) केले, याचे सकारात्मक दर्शन घडविणारा सातदिवसीय आगळा-वेगळा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, महिला विभाग, निगडी प्राधिकरण यांनी गुगल मीट (Google Meet) आणि फेसबुकच्या माध्यमातून राबविला. (Female persona in Ramayana portrayed by women)

कोविडच्या परिस्थितीत स्त्री वर्गात सकारात्मकता जागरूक ठेवणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमादरम्यान काही जणी क्वारंटाइन असूनही सहभागी झाल्या. त्यांच्यातील भीती नाहीशी होऊन त्यांची सुधारणा गतीने झाली. प्रा. ऊर्मिला अघोर यांच्या ओघवत्या वाणीने किमया घडवून आणली. अघोर यांनी विविध ग्रंथांची उदाहरणे, रामायणातील आणि आजची कोरोनातील परिस्थिती याची एकमेकांशी योग्य सांगड घालून व्याख्यानमाला प्रभावी राबवली. स्त्रीमधील सात रूपांना ही व्याख्यानमाला समर्पित होती. रामायणातील एकवीस स्त्री व्यक्तिरेखांचा यात समावेश होता. कित्येक व्यक्तिरेखा माहीत नसल्याने श्रोत्यांची उत्कंठा वाढली.

Ramayan
पिंपरी : रुग्णालये व दवाखान्यातील मानधनावरील कर्मचाऱ्यांना मिळणार भत्ता

पहिले पुष्प समर्पित होते मातृरूपाला. यात कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी या तिघींची वैशिष्ट्ये, गुण, स्वभावाचे कंगोरे यांचे बारकावे वर्णन केले. द्वितीय पुष्पमालेत होते कन्या आणि भगिनी रूपासाठी जया, सुप्रभा, ऊर्मिला, मांडवी आणि श्रुतिकीर्ती यांचा तसेच तृतीय पुष्पमाला शक्तिरूपासाठी होती. त्यात शक्तीच्या घातक रूपाचे दर्शन मंथरा, त्राटिका, शूर्पणखा आणि गिजरा यांच्या रूपातून घडले. चौथे पुष्प गुंफले गेले ऋषितुल्य रूपासाठी. लोपामुद्रा, अहिल्या आणि शबरी ह्या ऋषीसमान तपस्या केलेल्या व्यक्तिरेखा. पाचवे पुष्प गुंफले गेले आदर्श रूपासाठी. वर्तनातून आदर्श निर्माण करणाऱ्या सरमा, मंदोदरी आणि तारा यांना वंदन करण्यासाठी. सहावे पुष्प पत्नी रूपाला. सीतेच्या रूपातून ही व्यक्तिरेखा उलगडत गेली, तिच्यातील गुण, समर्पण, स्वभावाच्या बारकाव्यातून. सातवे पुष्प स्त्रीच्या पूर्ण रूपाला. मातृरूप आणि पत्नी रूपाच्या एकरुपतेला. आठवा दिवस अर्पण केली रामलल्लाला. या दिवशी सुंदर कीर्तन झाले. त्यानंतर संपदा रानडे यांचे ‘राम जन्माला गं सख’ हे गीत झाले. दोनशे ते अडीचशे घरात रामजन्म सोहळा साजरा केला गेला आणि एकाच वेळी आरती केली गेली. घरात मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली. वेदिता कछवा, शैलजा सांगळे, शिल्पा बिबिकर, प्रदीप पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.