भोई समाज बांधवांना मत्स्य जाळे वाटप

वडगाव नगरपंचायतीकडून कोरोना संकटामुळे मदतीचा हात
pcmc
pcmcsakal
Updated on

वडगाव मावळ : कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेले गावपातळीवरील छोटे व्यवसाय लक्षात घेऊन वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी स्वखर्चातून वडगाव शहरातील सर्व भोई समाज बांधवांना मत्स्य व्यवसायासाठी जाळे उपलब्ध करून दिले. (PCMC News)

वडगाव शहरात निःस्वार्थी व प्रामाणिकपणे मासेमारी करणारा भोई समाज मोठ्या प्रमाणावर आहे. परंपरेनुसार ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांची सर्वप्रथम पालखी उचलण्याचा मानही या समाजाला आहे. कोरोनाच्या काळात सर्वच व्यवसायांवर मोठे संकट ओढवल्याने अनेक व्यवसाय मोडकळीस आले आहेत. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होत असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. भोई समाजाला मत्स्य व्यवसाय नव्या जोमाने करता यावा या उद्देशाने नगराध्यक्ष ढोरे यांनी स्वखर्चातून वडगाव शहरातील सर्वच समाज बांधवांना जाळे उपलब्ध करून दिले.

pcmc
पिंपरी-चिंचवड शहरात आज २१६ नवीन रुग्ण

त्यांचे वाटप नगराध्यक्ष ढोरे यांच्यासह नगरसेवक राजेंद्र कुडे, माजी सरपंच बापूसाहेब वाघवले, माजी उपसरपंच बाळासाहेब दौंडे, नाना वाघवले, बंटी वाघवले आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. आगामी काळात मत्स्य उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी व हा उद्योग अधिक विकसित होण्यासाठी मासेमारी करण्यासाठी बोटी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन ढोरे यांनी दिले. शहरातील वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा घटकांपर्यत पोचण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. भोई समाजाच्या वतीने ढोरे यांचे आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.