Jobs : फ्रेशर्स ९४ टक्के अभियंत्यांना नोकऱ्यांची प्रतीक्षा

पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात बावीस वयोगटापर्यंत असलेले कित्येक हजार फ्रेशर्स नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
Jobs
JobsSakal
Updated on
Summary

पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात बावीस वयोगटापर्यंत असलेले कित्येक हजार फ्रेशर्स नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी - फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज असोसिएशनने प्राथमिक स्वरूपात पुणे जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात मिळालेली माहिती धक्कादायक आहे. ७१ टक्के फ्रेशर्स अभियंत्यांना कामावर रुजू होण्याची तारीखच कळविली जात नाही, कंपन्यांमधून थांबा व प्रतीक्षा करा याच्याशीच सामना करावा लागत आहे. परिणामी, फ्रेशर्सना नैराश्य येत असल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात बावीस वयोगटापर्यंत असलेले कित्येक हजार फ्रेशर्स नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. चांगल्या कंपनीतून सुरुवात झाली की, दुसऱ्या कंपनीत अधिक चांगली संधी मिळत असते. मात्र, कित्येकदा प्रत्यक्ष मुलाखत, टेलिफोनिक मुलाखत व ‘एचआर’सोबत झालेल्या राउंडनंतरही रुजू होण्याबद्दल कळविले जात नाही. अशा वेळी प्रतीक्षा करत रहायचे की दुसऱ्या कंपनीत नोकरीचा शोध सुरू ठेवायचा, असा संभ्रम निर्माण होत आहे. उमेदीचे दिवस जात असल्याने फ्रेशर्सच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.

आत्तापर्यंत १८७ अभियंत्यांनी नोंदविलेल्या मतांमध्ये १०० पैकी ९४.६ टक्के जणांनी आत्तापर्यंत अडचणी भेडसावत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांकडून कामावर रुजू करून घेण्यास विलंब होत असल्याचे, तसेच अनेक कंपन्या दुसऱ्या कंपनीत रुजू होईपर्यंत काहीच कळवीत नसल्याचेही तरुणांनी मत नोंदविले आहे. तीन आठवड्यापर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच, कॅम्पस मुलाखतीमधील काही तरुणांसोबत चर्चा करण्यात आली आहे. सर्वाधिक संख्या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले हे तरुण आहेत.

असे घडतात प्रकार...

मुलाखत घेऊन कामावर रुजू करण्याच्या सूचना न देणे, नोकरीची ऑफर रद्द करणे, नोकरीच्या बॉन्डबद्दल अस्पष्टता, मूळ कंपनीकडून पगार न करणे, अचानक टर्मिनेट करणे, कमी पगारात रुजू करून घेणे

काही अभियंत्यांचा सर्व्हे केल्यानंतर फ्रेशर्सच्या अडचणी समोर आल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना हा अहवाल पाठविणार आहे. त्यांनी माहिती आकडेवारी स्वरूपात उपलब्ध करुन देण्यास सांगितले होते. त्यानुसार आम्ही तरुणांची मते नोंदवून घेतली आहेत.

- पवनजित माने, सदस्य, राज्य आयटी कमिटी

२० ते ३० हजार फ्रेशर्स - पुणे व पिंपरी-चिंचवड

३०० ते ४०० - बड्या कंपन्या

५ ते ७ हजार - मुलाखतीसाठी ई-मेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()