गॅरेज चालकाला मगरींपुढे लटकविण्याची धमकी; गायकवाड बाप-लेकासह चौघांवर गुन्हा

औंध येथील गायकवाड बाप-लेकाचा आणखी एक उद्योग समोर आला आहे. कर्जाचे व्याज थकलायच्या कारणावरून गॅरेज चालकाला फार्म हाऊसवर नेत पिस्तूलाचा धाक दाखवून हवेत तीन वेळा गोळीबार केला.
Crime
CrimeSakal
Updated on

पिंपरी - औंध येथील गायकवाड बाप-लेकाचा आणखी एक उद्योग समोर आला आहे. कर्जाचे व्याज थकलायच्या कारणावरून गॅरेज चालकाला (Garage Owner) फार्म हाऊसवर नेत पिस्तूलाचा धाक दाखवून हवेत तीन वेळा गोळीबार (Firing) केला. तेथील तलावातील मगरींपुढे (Crocodile) लटकवून अथवा तुकडे करून मगरींना खाऊ घालण्याची धमकी (Warning) दिली. तसेच गॅरेजमधील महागड्या मोटारीसह इतर २५ लाख ६० हजारांचे साहित्य जबरदस्तीने नेले. याप्रकरणी गायकवाड बाप-लेकासह चौघांवर दरोडा व सावकारी अधिनियमांतर्गत सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना पिंपळे निलख येथे घडली.

नानासाहेब शंकरराव गायकवाड (वय ७०), गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६, दोघे रा. औंध), त्यांचा वाहनचालक राजाभाऊ अंकुश आणि अ‍ॅड. नाणेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गॅरेज चालक विठ्ठल शिवानंद गुरव (वय ३३, रा. सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी नाना गायकवाड यांच्याकडून सुमारे ३५ लाख रुपये कर्ज व्याजाने घेतले. त्यातील २८ लाख रुपये त्यांना परत केले होते. मात्र, चक्रवाढ व्याज लावत असल्याने रक्कम वाढत गेली.

Crime
सुनेने सततच्या भांडणातून भाच्याच्या मदतीने केला वृद्ध सासूचा खून

अशातच कर्जाचे व्याज थकल्याच्या कारणावरून वाहनचालक राजाभाऊ याने गायकवाड याच्या सांगण्यावरून वेळोवेळी प्रत्यक्ष व फोनवरून गुरव यांना जिवे मारण्याची धमकी दिली. अ‍ॅड. नाणेकर याने गुरव यांच्याकडून झालेल्या व्यवहाराबाबत पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन नोंदवून घेतले. त्यातील मजकूर वाचायला न देता त्यावर गुरव यांची सही घेतली.

त्यानंतर काही दिवसांनी गुरव यांना जबरदस्तीने मोटारीतून सूस येथील गायकवाड यांच्या एनएसजी फार्म हाऊसवर नेले. तेथे नानासाहेब याच्या सांगण्यावरून राजाभाऊ याने गुरव यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हवेत तीन वेळा गोळीबार केला. तसेच फार्म हाऊसमधील तलावातील मगरींपुढे लटकवून अथवा तुकडे करून मगरींना खायला घालण्याची धमकी दिली.

Crime
...तरच लढत‘नॉकआउट’

त्यानंतर पंधरा दिवसांनी गुरव यांच्या विशालनगर येथील गॅरेजवर १५ माणसांसह एक ट्रक व दोन टेम्पोंसह आरोपी आले. गुरव यांना गॅरेजवर बोलवून घेत राजाभाऊने त्यांना मारहाण करून खाली पाडले. जिवे मारण्याची धमकी देत गॅरेज मधून गॅरेजचे साहित्य, मशीनरी व गॅरेजमधील तीन मोटारी जबरदस्तीने नेल्या. कोणताही सावकारी परवाना नसताना बेकायदेशीररित्या आरोपींनी साहित्य नेले. दरम्यान, आरोपी नानासाहेब व गणेश या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

बाप-लेकावर मोकांतर्गत कारवाई

कट रचून बनावट कागद्पत्राद्वारे फसवणूक करणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे आठ गंभीर गुन्हे या बाप-लेकासह त्यांच्या टोळीवर विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. यामुळे काही दिवसांपूर्वीच पिंपरी - चिंचवड पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई केलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()