पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी संस्थेला चालविण्यास दिलेल्या फुगेवाडीच्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे शाळेतील एका कर्मचाऱ्याने अश्लील शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानंतर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दापोडी पोलिसांत धाव घेतली. ‘आरोपीवर कठोर कारवाई करा, अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली.