पिंपरी : घरगुती कचऱ्याचे घरीच कंपोस्टिंग करावे. त्याला प्रोत्साहन द्यावे. यासाठी ही अनुदान योजना राबविण्यात येत आहे. महापालिका कंपोस्टींग यंत्रणा उभारण्यासाठी प्रत्येक प्रभागातील ५०० असे आठ प्रभागातील ४ हजार नागरिकांना कंपोस्ट बिन्स खरेदीकरिता अनुदान देणार आहे. डीबीटी अंतर्गत थेट खात्यावर अनुदान वितरित केले जाणार आहे. कंपोस्ट बिन्स देण्यासाठी ग्रीनीशओरा सोल्युशन्स या संस्थेची नियुक्ती केली आहे. एका कंपोस्ट बिन किटची १०९७ रुपये किंमत आहे.(composting should be done at home)
या संस्थेकडून बिन्स खरेदी केल्यानंतर त्याची पावती क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावी लागणार असून त्यानंतर बिन खरेदीच्या ५० टक्के रक्कम महापालिका खात्यावर जमा करणार आहे. महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत होम कंपोस्टींगवर भर दिला आहे. घरीच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. ज्यांच्याकडे होम कंपोस्टींग उभारण्यासाठी मोकळी जागा आहे. सदनिकांमध्ये, बैठी घरे, होम कंपोस्टींग करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना महापालिका अनुदान देणार आहे. डीबीटी अंतर्गत थेट खात्यावर अनुदान वितरित केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात दोन निविदाधारक सहभागी झाले. ग्रीनीशओरा सोल्युशन्स या संस्थेने १ कंपोस्ट बिन किटची किंमत जीएसटीसह १ हजार ९७ रुपये दिली. त्यांचा दर लघुत्तम असल्याने स्वीकृत करण्यात आला. त्यानुसार त्यांना काम देण्यात आले.
‘‘५०० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाल्यास ‘ड्रॉ’ काढून अनुदान दिले जाईल. निविदा प्रक्रियेत ग्रीनीशओरा सोल्युशन्स संस्थेने सर्वात कमी दर दिला. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली. नागरिकांनी ग्रीनीशओरा सोल्युशन्स या संस्थेकडून कंपोस्ट बिनची खरेदी करावी. खरेदी केल्याची पावती क्षेत्रीय अधिकाऱ्ंयाकडे जमा करावी. क्षेत्रीय अधिका-यांकडून आरोग्य विभागाकडे ही पावती येईल. त्यानंतर बिन खरेदी केलेल्या नागरिकाच्या खात्यावर ५० टक्के रक्कम टाकली जाईल. या उपक्रमामुळे शहरात घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण आणि कंपोस्टिंग होऊन कचरा समस्या कमी होण्यास मदत होईल”.
- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.