Sakal Vidya : विविध प्रवेश परीक्षांबाबत रविवारी मार्गदर्शन

सध्या पालकांना पाल्यांच्या करियरच्या विचाराने ग्रासले आहे. आपल्या मुलाने अभियांत्रिकीला जावे की, वैद्यकीय क्षेत्राची निवड करावी? नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर पालकांना मिळत नाही.
sakal vidya
Sakal-Vidyasakal
Updated on

पिंपरी - सध्या पालकांना पाल्यांच्या करियरच्या विचाराने ग्रासले आहे. आपल्या मुलाने अभियांत्रिकीला जावे की, वैद्यकीय क्षेत्राची निवड करावी? नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर पालकांना मिळत नाही. म्हणूनच ‘सकाळ विद्या’ व ‘एक्‍सिड’ने (एक्‍सलंट एज्युकेशन) पालकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी विविध करिअर आणि प्रवेश परीक्षांबाबत मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.१२) सकाळी नऊ वाजता चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हे चर्चासत्र होणार आहे.

या चर्चासत्रात, वैद्यकीय, विज्ञान शाखेतील शिक्षण आणि प्रवेश; राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी का व कशी करावी ?; एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा अशा परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम, त्यांची तयारी; आगामी काळात अभ्यासक्रमात होणारे बदल; सहावी ते दहावीपासूनच तयारीला लागलो; तर बारावीमध्ये अभ्यासाचा ताण कसा कमी होऊ शकतो.

सीईटी, जेईई, नीट परीक्षांची तयारी, अभ्यासक्रमाचे नियोजन, बारावीनंतर अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेतील करिअरचे विविध पर्याय आणि त्यातील शिक्षण घेण्यासाठी देशातील नामांकित संस्था आयआयटी, एनआयटी, बीआयटी, व्हीआयटी, आयआयएससी, आयआयएसईआर, एनआयएसईआर व त्यांची प्रवेश प्रक्रिया याबाबतच्या शंकांचे निरसन चर्चासत्रातून होणार आहे.

यामध्ये दहावी, अकरावी, बारावीसह सहावी ते नववीपर्यंतचे विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. त्यांना करिअर व समुपदेशन क्षेत्रातील २० वर्षांचा अनुभव असलेले प्रा. आशिष दुबे हे मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी व पालकांच्या करिअर व प्रवेश परीक्षांतील बदलांविषयीच्या सर्व शंका व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील.

कोण आहेत प्रा. आशिष दुबे?

मुंबई आयआयटीमधून बी.टेक (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी) आणि एम.टेक (मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) शिक्षण केले आहे. २००१ मध्ये उत्तीर्ण झाल्यावर इन्फोसिसमध्ये नोकरी केली. पण, घरात शैक्षणिक वारसा असल्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन १० वर्षांपासून मुलांना करिअर मार्गदर्शन करत आहे. आजवर १०० हून अधिक विद्यार्थी विविध आयआयटी कॉलेजला प्रवेशित झाले आहेत. ‘केमिस्ट्री’ विषयात ते पारंगत आहेत.

विद्यार्थीदशा ते शिक्षक आणि पालक असा त्‍यांचा प्रवास ते विद्यार्थी आणि पालकांसमोर उलगडणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेबरोबरच विविध सीईटी परीक्षांना कसे सामोरे जायचे ? यावर स्वानुभव सांगणार आहे. तसेच इयत्ता सहावीपासूनच पाया कसा मजबूत होईल, यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

काय?- कधी? केव्हा? कुठे?

काय? - स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रम तयारी

कधी? - रविवारी १२ मे २०२४

केव्हा? - सकाळी ९ वाजता

कुठे? - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

प्रवेश - विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

नावनोंदणी निश्चित करण्यासाठी संपर्क करा

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

संपर्क - ८३७८९८७८३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.