पिंपरी-चिंचवडसह देहू आणि परिसरात दुपारी जवळपास अर्धा तास गारांचा जोरदार पाऊस बरसला. यामुळं रस्ते, शेतांमध्ये सगळीकडं गारांचा अक्षरशः खच पडल्याचं पहायला मिळालं. यामुळं हवेतही चांगलाच गारठा निर्माण झाला होता. (Hailstorm for half an hour in Pimpri Chinchwad Feel of snow on roads fields)
अचानक झालेल्या गारपीटीमुळं नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. गारांच जोरदार मारा अनुभवल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुमारे अर्धा तास हा गारांचा वर्षाव झाला. त्यामुळं जणून हिमवर्षावरच होत असल्याचं वातावरण निर्माण झालं होतं. यामुळं बर्फवृष्टी झाल्यानंतर होतो तसा हवेत गारवा निर्माण झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.