Har Ghar Tiranga : मोदीजी...! घर नाही तिरंगा कुठे लावू....? पुण्यातील विद्यार्थिनींचा पंतप्रधानांना ई-मेल

देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकार ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवत आहे. त्या मोहिमेत मलाही सहभाग नोंदवायचा आहे.
Rented Home
Rented HomeSakal
Updated on
Summary

देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकार ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवत आहे. त्या मोहिमेत मलाही सहभाग नोंदवायचा आहे.

Summary

पिंपरी - देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकार ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवत आहे. त्या मोहिमेत मलाही सहभाग नोंदवायचा आहे. परंतु, माझी आर्थिक परिस्थिती पाहता केवळ तिरंगा खरेदी करणे शक्य आहे. माझ्याकडे रहायला घर नाही. त्यामुळे, पंतप्रधान महोदयांना माझी विनंती आहे की, ‘या मोहिमेत सहभागी होण्यासाठी मला घर द्यावे. माझ्या परिवारात मी, माझी आई, माझा लहान भाऊ आणि मोठी बहीण असे चौघे जण आहोत. वडीलांचे निधन झाले आहे. वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. परंतु, भारताची मान उंचावण्यासाठी आपण मला प्रोत्साहित करावे. अशा समर्पक शब्दांमध्ये नव्या सांगवीत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या दिव्या जोशीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इ मेलद्वारे कळकळीची विनंती केली आहे की, मोदीजी...! घर नाही. तिरंगा कुठे लावू....?

पिंपरी चिंचवड मधील नवी सांगवी, काटेपुरम, नेताजी नगर, लेन नंबर दोनमध्ये राहणारे व मूळचे संभाजीनगर मधील जोशी कुटुंबाची निवाऱ्याची व्यथा हर घर तिरंगा मोहिमेमुळे समोर आली आहे. शहरात हक्काचा निवारा नसणाऱ्या अनेकांना हीच खंत सतावत आहे. गेल्या तीन वर्षापासून उदरनिर्वाहासाठी ते कुटुंब पुण्यात आले. वडीलांचे १२ वर्षापूर्वी निधन झाले. त्यानंतर, गेल्या तीन वर्षापासून भाडेतत्त्वावर पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये दिव्याचे कुटुंब राहत आहे.

मोदींना पत्र लिहिलेली दिव्या.अ.जोशी (वय १९) कमवा शिका अंतर्गत औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात बी.ए मध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत काम करीत आहे. दिव्याची मोठी बहीण चेतना जोशी एका खासगी शाळेत कामाला जाते. त्यातही अर्धा पगार कंत्राटी असल्याने कामावर लावलेल्या संस्थेला जातो व उर्वरित अर्धा पगार तिच्या बहिणीच्या हातात मिळतो. शिवाय, आई आरती जोशी गृहिणी आहे. भाऊ ओमकार जोशी नुकताच दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे, उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. जेमतेम मिळणाऱ्या पैशातही घर खर्च भागविणे तिला अवघड झाले आहे.

आपण मला घर घेण्यासाठी आर्थिक साहाय्य करून हर घर तिरंगा मोहिमेमध्ये सहभागी करावे. आम्हाला जगण्यासाठी कोणताच आधार नाही. महागाईने प्रचंड मेटाकुटीला आलो आहोत. भारताचा स्वातंत्र्य दिन मलाही आनंदाने साजरा करावयाचा आहे. केवळ पंतप्रधानाच्या मदतीची अपेक्षा आहे. ध्वज मी खरेदी करेल. परंतु, घर खरेदी करु शकत नाही. मलाही हक्काच्या घरात राहायचं आहे. वडील गेल्यानंतर आईला काम होत नाही. त्यामुळे, मी मोदींना इ मेल केला आहे. आता पीएम कार्यालयाला पत्र पाठवणार आहे. अपेक्षा आहे की, त्यांची मदत मिळेल.

- दिव्या जोशी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, नवी सांगवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.