आदर्शनगरमध्ये ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर

आदर्शनगरमध्ये ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर

Published on

पिंपरी, ता. १७ ः आदर्श नगर-किवळे येथील सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा, मधुमेह, रक्तदाब, मुतखडा, कंबरदुखी, हाडांचे ठिसुळता, ऑक्सिजन पातळी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून विशेष तपासणी व मोफत सल्ला देण्यात आला. यावेळी सुमारे दोनशे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याची तपासणी करून घेतली. यावेळी संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे, उपाध्यक्ष साहेबराव देसले, सचिव रमेश थोरात, खजिनदार प्रकाश सावंत, संचालक तुकाराम कोरडे, बाबासाहेब मोहिते, रंजना सस्ते, रवींद्र मुळबागल, भिमाशंकर जाधव, रवींद्र कदम , राजेंद्र मोरे, निवृती आवटे, शशिकला दास उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश बडगुजर यांनी केले. किशोर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.