पीएफ, वेतन फरकापासून ‘आरोग्यदूत’ वंचित

Rupees
Rupees
Updated on

कचरा वाहनचालकांची व्यथा; रक्कम बँक खात्यावर जमा करण्याची मागणी
पिंपरी - महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जानेवारी २०११ ते मार्च २०१५ कालावधीमध्ये घरोघरचा कचरा गोळा करणे, वाहतूक करणे या कामासाठी कार्यरत असणाऱ्या कामगारांना अद्यापही पीएफ व मासिक वेतनाच्या फरकाची रक्कम दिली नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे ती रक्कम संबंधित कामगारांच्या बँक खात्यावर तत्काळ अदा करण्याची मागणी कचरा गाडीवरील वाहन चालकांकडून होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात आरोग्य विभागामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे, वाहतूक करणे कामकाजासाठी जानेवारी २०११ ते मार्च २०१५ मध्ये श्री संत गाडगे बाबा महाराज स्वयंरोजगार संस्था व रमाबाई स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला काम दिले होते. या संस्थेच्या कामगारांचा पीएफची रक्कम देणे बाकी असल्याने त्याची उर्वरित पीएफची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या संबंधिचे पत्र ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आरोग्याधिकारी महादेव शिंदे यांच्याकडून सहा मार्च २०२० रोजी आरोग्य निरीक्षक, कचरा वाहतूक विभाग, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयास दिले आहे. पत्रासोबत कचरा गोळा करणाऱ्‍या कामगारांची यादीही देण्यात आली आहे. परंतु या यादीत कचरा वाहतूक करणारे वाहनचालक व निरीक्षक (सुपरवायझर) यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने ते हतबल झाले आहेत.

वाहनचालक गणेश नागवडे म्हणाले, ‘या निधीपासून आम्ही वंचित आहोत. तसेच आम्हाला त्या कालावधीत दिलेल्या मासिक वेतनाचा फरकही दिलेला नाही.’ अतुल क्षीरसागर म्हणाले, ‘या कालावधीत ‘ब’ व ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना रक्कम मिळालेली नाही.’ शांती गवळी म्हणाल्या, ‘कचरा वेचक कामगारांचा पीएफ व मासिक वेतनाच्या फरकाची रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी.’ प्रदीप धाटे म्हणाले, ‘कचरागाडीवर आम्हीदेखील काम केली आहेत. महापालिकेने आमचा विचार केला पाहिजे.’ नीलेश काळे म्हणाले, ‘‘याबाबत आम्ही महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदन आहे.’ प्रवीण दास  म्हणाले, ‘दहा वर्षापासून आम्हा कामगारांना हक्काच्या रकमेपासून लाभापासून दूर ठेवले आहे.’’

याबाबत बैठक घेतली आहे. इतर प्रभागातून माहिती मागवली आहे. लवकरच निर्णय होईल.
- विनोद बेंडाळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग, महापालिका

कोरोना काळात कचरा गाडीवर काम केले आहे. महापालिकेने याचा विचार करून या वाहन चालकांचा पीएफ व मासिक वेतनाच्या फरकाची रक्कम तत्काळ अदा केली पाहिजे. हा विषय आयुक्तांकडे मांडला आहे.
- दीपक खैरनार, सामाजिक कार्यकर्ते

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.