Hit and Run : भुजबळ चौकाजवळ तरुणीला उडविल्याचे प्रकरण उघडकीस

अखेर वीस दिवसांनी मोटारचालकावर गुन्हा.
Crime
Crimesakal
Updated on

हिंजवडी - पुण्यातील हीट अँड रन’ प्रकरण देशभर गाजत आहे. त्याचदरम्यानच वाकड-हिंजवडी रस्त्यावर भुजबळ चौकाजवळ भरधाव मोटारीने एका तरुणीला उडविल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मंगळवारी (ता. ११) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आणि तब्बल वीस दिवसांनी या अपघातप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आकांक्षा संजयसिंह परदेशी (वय २३, रा. समाजकल्याण ऑफिसजवळ, पुणे कॅम्प) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून, ती हिंजवडीत शिक्षण घेत आहे. याप्रकरणी जखमी तरुणीचा भाऊ उत्कर्ष संजयसिंह परदेशी (वय २३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर वाहनचालक तुषार नेमाडे (वय ४६, रा. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊनही पोलिस दफ्तरी ना तक्रार, ना जबाब, ना फिर्याद, अशी स्थिती होती. पोलिसांत काहीच नोंद नसल्याने माध्यमांनी या बाबत आवाज उठविला. यानंतर हिंजवडी पोलिसांनी जखमी तरुणीच्या भावाला बोलावून घेत तक्रार घेतली आहे.

आकांक्षा २३ मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हिंजवडीकडून वाकडकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाकडे चालत जात होत्या, त्यावेळी तुषार नेमाडे याने मोटार (एमएच १४, जेयू ५६९०) भरधाव चालवून आकांक्षा हिला मागून जोरदार धडक दिली. यात आकांक्षा जखमी झाली होती.

अपघात झालेल्या दिवशी आकांक्षावर उपचार करण्यासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले, नंतर ते पोलिस ठाण्यात न येता आकांक्षा आणि तिचा भाऊ मुंबईला निघून गेले. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आकांक्षा किरकोळ जखमी असून, तिची तब्येत सध्या ठीक आहे.

- कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी

अपघातामध्ये माझी बहीण आकांक्षा हिला मुका मार लागला आहे. अपघातानंतर आम्ही मुंबईला आलो. डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. अपघातप्रकरणी आम्ही फिर्याद दिल्यानुसार हिंजवडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- उत्कर्ष परदेशी, फिर्यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.