Hoarding Collapse : 5 जणांचा जीव गेल्यानंतर मनपाला जाग; अखेर अनधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात

किवळे येथे होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेने ही कारवाई सुरू केली आहे.
Hording
HordingSakal
Updated on

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील किवळे परिसरात होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा नागरिकांनी यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले असून ही कारवाई केली आहे.

Hording
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

किवळे येथे होर्डींग पडून झालेल्या अपघातामध्ये पाच नागरीकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी घडली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने त्वरीत अनधिकृत होर्डींग्सविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली.

तर पुणे महापालिकेने देखील बुधवारपासून अनधिकृत होर्डींग्सविरुद्ध कडक भुमिका घेत होर्डींग्स काढून टाकण्याच्या कारवाईला सुरुवात केली. बुधवारी सकाळपासूनच शहराच्या विविध भागांमध्ये होर्डींग्स, फ्लेक्‍स विरुद्धची कारवाई करण्यास सुरुवात झाली.

Hording
Illegal Hoarding Crime : पुणे महापालिकेकडून अनधिकृत होर्डींगविरुद्ध कारवाईचा बडगा


पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातील 21 होर्डींग्स समवेत 239 हून अधिक फ्लेक्‍स, बॅनर, बोर्ड महापालिकेच्या पथकांनी काढून टाकले. विनापरवाना जाहीरात होर्डींग व बोर्ड लावणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने गुन्हा दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.