पिंपरी - पुणे-मुंबई (Pune Mumbai) दरम्यान धावणाऱ्या एकमेव डेक्कन क्वीन (Deccan Queen) रेल्वे १४ मे पासून रद्द केल्याने शेकडो प्रवाशांची (Passenger) प्रचंड गैरसोय (Inconvenience) झाली आहे. नोकरीनिमित्त अत्यावश्यक सेवेतील दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून, असुविधांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) कमी प्रवासी असल्याचे कारण देत रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, तोट्याचा विचार न करता कर्मचाऱ्यांचा विचार करून डेक्कन व सिंहगड रेल्वे सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवडच्या माध्यमातून करण्यात आली आहे. (Hundreds of passengers inconvenienced by the closure of the Deccan Queen)
गेल्या लॉकडाउनपासून प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. मागील वर्षी रेल्वे सेवा बंद असल्याने कित्येक महिने प्रवाशांना भर पावसाळ्यात खासगी वाहनाने, दुचाकीने जीव धोक्यात घालून आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीन सुरू करण्यात आली होती, त्यातही आरक्षण करूनच प्रवास करावा लागत होता. तरी कित्येक प्रवाशांनी दरमहा चार ते पाच हजार रुपये खर्चून रेल्वेने प्रवास केला. कोरोनाच्या महामारीचे संकट असतानाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जिवाची बाजी लावून कर्तव्य पार पाडत होते.
रेल्वे सेवा बंद असल्याने हजारो खासगी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. दैनंदिन प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रेल्वे सेवा बंद केल्याने प्रवास कसा करावा हा प्रश्न उभा राहिला आहे. प्रवाशांमध्ये राज्य सरकारी, बॅक, पोलिस, आरोग्य, महानगरपालिका, रेल्वे, विद्युत विभागातील व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याची संख्या हजारोंच्या घरात आहे. यामध्ये महिला प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व प्रवाशांना आता मोठ्या प्रमाणात त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
दरवेळी रेल्वेचे अधिकारी फक्त फायदा तोट्याचाच विचार करत असतात. डेक्कन क्वीन या गाडीला पुणे-लोणावळा-दादर आणि परतीच्या प्रवासात सी एस एम टी-कर्जत-लोणावळा-पुणे इतके कमी थांबे असल्याने प्रवासी संख्या कमी आहे, जर डेक्कन क्वीन ऐवजी जादा थांबे असलेली सिंहगड एक्सप्रेस ११०१०/११००९ (शिवाजीनगर, खडकी, पिंपरी चिंचवड, लोणावळा, खंडाळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर) सुरू ठेवली तर प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
- इक्बाल मुलाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.