पिंपरीत खासगी ट्रॅव्हल्समधून अवैध वाहतूक

चोरीच्या दुचाकी नेल्याप्रकरणी शहरात प्रथमच कारवाई
travaling
travalingsakal
Updated on

पिंपरी : ‘गुजरात, राजस्थानमधून येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून गुटखा आणला जातो. प्रवासी बॅगांमुळे कोणालाच संशय येत नाही. कधी कधी आमच्या गाडीतही हे लोक येतात,’ हे शब्द आहेत चिंचवड ते मुंबई प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका मोटार चालकाचे. अशाच ट्रॅव्हल्समधून चोरीच्या दुचाकी जळगाव परिसरात नेऊन विकणाऱ्या टोळीला पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे अशा काही ट्रॅव्हल्समधून चोरीचा व अवैध मालाची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट होते.

शहरातून गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या व मोठ्या शहरांसाठी सकाळी शहरात आलेल्या बस भोसरीतील लांडेवाडी, गावजत्रा मैदान, निगडी, आकुर्डी रेल्वेस्थानक परिसरात दिवसभर थांबतात. सायंकाळी पाचनंतर आपापल्या मार्गाने जातात. अशाच तीन बसचा उपयोग चोरीच्या दुचाकी वाहतुकीसाठी झाल्याचे २८ जुलै रोजी उघड झाले. त्यातील मुख्यसुत्रधार सुनील महाजनला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेतले होते. तो रावेर, जळगाव परिसरात दुचाकी विकायचा.

travaling
कात्रज चौक ते दत्तनगर चौक रस्त्यावर वाहतूक कोंडी

त्याच्याकडून चोरीच्या २२ दुचाकी जप्त केल्या आहेत. अशाच बसमधून गुटख्याची वाहतुकीतही होत असल्याची चर्चा चिंचवड स्टेशन ते मुंबई दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारचालकांमध्ये आहे. गुजरात, राजस्थानमधून आणलेला माल शहरातील विक्रेत्यांकडे पोहोच होत असल्याचे चालकाने सांगितले.

ट्रॅव्हल्स बसची आसनक्षमता चाळीस आहे. कोरोना काळात ५० टक्के क्षमतेने वाहतूक सुरू होती. लगेज वा पार्सलची संख्या कमी होती. त्यामुळे चोरलेल्या दुचाकी बसच्या डिग्गीतून नेल्या जायच्या. त्यापोटी बसचालकांना पैसे मिळायचे. त्याचा हिशेब ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयात नसायचा. ती सर्व वरकमाई चालक व त्याचा मदतनीसाला मिळायची. शिवाय, बसचालक केबिनमध्ये बसवूनही प्रवासी वाहतूक करतात.

travaling
बहिण-भावाची शेवटी भेट झालीच नाही!

त्यांच्या प्रवासभाडेपोटी मिळणारी रक्कम चालक व मदतनीस वाटून घेतात. एका बससाठी दोन चालक व एक मदतनीस असतो. एसी, नॉनएसी प्रकार व कंपनीनुसार पुणे ते जळगाव प्रवासाचे बसभाडे आठशे ते हजार रुपये आहे. मात्र, चालकाशेजारी केबिनमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून केवळ तीनशे ते चारशे रुपये घेतले जातात. निम्मेपेक्षाही कमी किमतीत प्रवाशाचा प्रवास होतो व चालकांना वरकमाई मिळते.

एका चालकाला किमान वीस हजार रुपये पगार आहे. एक खेप पूर्ण केल्यानंतर त्याला एक दिवस सुटी असते. म्हणजेच गुरुवारी रात्री जळगावहून निघालेली बस शुक्रवारी सकाळी पुण्यात पोहोचते. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातून निघून शनिवारी सकाळी जळगावला पोहोचते. नोकरी गेली अन्...दुचाकी चोरीतील मुख्य सूत्रधार सुनील महाजन विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. लॉकडाउन काळात त्याची नोकरी गेली.

त्या तणावात दारुचे व्यसन लागले आणि तो दुचाकी चोरू लागला. सध्या तो अटकेत आहे. मात्र, चोरीच्या प्रकारात ट्रॅव्हल्सचे बसचालक व मदतनीस पहिल्यांदाच आढळले असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.