आयटीयन्सच्या हक्काच्या पगारी रजावर गदा

बड्या आयटी कंपन्यांनी गेल्या काही दिवसांपासून आयटीयन्सच्या हक्काच्या पगारी रजावर गदा आणली आहे.
IT Company
IT CompanySakal
Updated on

पिंपरी - बड्या आयटी कंपन्यांनी (IT COmpany) गेल्या काही दिवसांपासून आयटीयन्सच्या हक्काच्या पगारी रजावर (Paid Leave) गदा आणली आहे. १२ ते १३ वर्षे नोकरीत (Job) राहूनही अनेक आयटीयन्सना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. वर्षाकाठी ४५ दिवसांच्यावर पगारी रजा शिल्लक ठेवण्याची मुभा आहे. आजारपणाच्या रजा संपल्यानंतर या रजा कामी येत होत्या. परंतु, या रजाच आता पुढील वर्षाच्या बेरजेत धरल्या जात नसल्याने कठीण काळात पेचप्रसंग ओढवल्यास रजांची वाणवा होत आहे. सध्या या रजा घेण्यापासून आयटीयन्सना रोखले जात असून, कंपन्यांकडून कात्रीत पकडण्याचा प्रकार सुरू आहे.

शहरात आयटीयन्स नोकरदार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काहींच्या रजा शिल्लक राहिल्यास त्या पुढील वर्षात बेरजेत धरल्या जात असे. परंतु, काही कंपन्यांमध्ये पगारी १५ ते २० रजा पुढील वर्षात ढकलल्या जात आहेत. बऱ्याच जणांच्या ६० रजा किरकोळ झाल्यानंतरही त्यांना या रजा मिळत असत. या रजा मनुष्यबळ विभागाकडून जमा केल्या जात असे. परंतु, या मोठ्या कंपन्यांनी आयटीयन्सच्या सुट्ट्यांवरच गंडांतर आणल्याचे समोर आले आहे.

IT Company
पुणे, पिंपरीकरांना खूशखबर, सोमवारपासून PMPच्या 1150 बस धावणार

एका वर्षात आजारपणाच्या रजा संपल्यानंतर त्या पुढील वर्षात धरल्या जात नाहीत. त्यामुळे त्या रजा सर्व संपतात. इतरवेळी किरकोळ रजाही बऱ्याच कारणामुळे संपून जात आहेत. त्यामुळे नोकरदारांच्या रजांची वाणवा होते. याबाबत कामगार आयुक्तांकडे आयटीयन्सने तक्रार केली आहे. मोठ्या कंपन्यांनी असे धोरण राबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोना काळात देखील बऱ्याच नोकरदारांना या रजा मिळाल्या नाहीत. पर्यायाने पगार कपातीचा सामना तरुणांना करावा लागत आहे.

‘सर्व नोकरदारांना कंपन्यांचे धोरण माहीत असायला हवे. आपल्या हक्काच्या रजा कपात होत असल्याने बऱ्याच जणांना कठीण कालावधीत रजा मिळणे अवघड झाले आहे. सध्या एका मोठ्या कंपनीविरोधात अशी अडवणूक सुरू आहे. अनेक लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये हे प्रकार घडत आहेत. याबाबत आयटीयन्सने जागरुक असायला हवे.’’

- पवनजीत माने, फाइट आयटी असोसिएशन प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.