Kiwale Hoarding Collapse : आईच्या आठवणी जपत ‘त्या’ करताहेत कष्ट

किवळ्यातील होर्डिंग दुर्घटना मृत शोभा टाक यांच्या मुलींची व्यथा
shobha vijay tak family
shobha vijay tak familysakal
Updated on

देहूरोड - मुंबई-बंगळूर महामार्गावर गेल्यावर्षी किवळे येथे कोसळलेल्या होर्डिंगखाली सापडून पाच जणांचा बळी गेला होता. त्यातील एका महिलेच्या दोन मुली आता कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांची आई जेथे काम करीत होत्या, त्याच ठिकाणी त्याही आईच्या आठवणी जपत काम करून उदरनिर्वाह करत आहेत.

गेल्या वर्षी १७ एप्रिल रोजी किवळेत होर्डिंग कोसळले होते. पाऊस व वादळापासून बचाव करण्यासाठी काही कष्टकरी कामगार त्याच्या आडोशाला थांबले होते. त्यात शोभा विजय टाक (वय ५०, पारशी चाळ, देहूरोड), वर्षा विलास केदारी (वय ५०, रा. गांधीनगर, देहूरोड), रामअवध प्रल्हाद आत्मज (वय २९, रा. उत्तर प्रदेश), भारती नितीन मंचल (वय ३३, रा. मामुर्डी), अनिता उमेश रॉय (वय ४५, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) यांचा मृत्यू झाला होता.

विशाल शिवशंकर यादव (वय २०, रा. उत्तरप्रदेश), रहमद मोहमंद अन्सारी (वय २१, रा. किवळे), रिंकी दिलीप रॉय (वय ४५, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) जखमी झाले होते. शोभा टाक रावेत येथील रुणाल गेटवेमध्ये हाउसकीपिंगचे काम करीत होत्या. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. त्यांच्यासमवेतच मुली राहायच्या.

आईच्या निधनानंतर काही महिने दुःखात गेले. पण, रोजच्या जगण्याचा प्रश्न होता. त्यामुळे मीना व रिना या आई काम करीत असलेल्या ठिकाणी रुजू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.