पिंपरी-चिंचवडमध्ये कामगारांची प्रचंड कमतरता; उद्योजकांनी उचलंय आता हे पाऊल

पिंपरी-चिंचवडमध्ये कामगारांची प्रचंड कमतरता; उद्योजकांनी उचलंय आता हे पाऊल
Updated on

पिंपरी : सरकारने परवानगी दिल्यानंतर उद्योग-व्यवसाय सुरू झाले असले, तरी अनेकांना कुशल कामगारांची प्रचंड कमतरता भासू लागली आहे. त्यासाठी उद्योजकांनी स्थानिक कामगारांसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी ही कमतरता भरून निघण्यास मदत होणार आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन सुरू केले होते. त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. अनेक परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यांमध्ये परत गेले आहे. आता कंपन्या सुरू झाल्या. मात्र, कुशल कामगारांची प्रचंड वानवा आहे. फॅब्रिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांना वेल्डर, फिटरची नितांत गरज आहे. मशिन ऑपरेटरला सर्वांत जास्त मागणी आहे. अनेक कंपन्यांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे प्लंबर, इलेक्‍ट्रिशियन यांना पुढचे 15 दिवस जास्त मागणी राहणार आहे. कुशल कामगारांअभावी उद्योजक स्वत:च मशिनवर काम करू लागले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका बड्या कंपनीने कामगारांना परत आणण्यासाठी उत्तर प्रदेश येथे बस पाठविली होती. मात्र, कामगारांच्या कुटुंबियांना कोरोनाच्या भीतीमुळे कामगारांना परत पाठविण्यात नकार दिला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महिलांना जास्त संधी 

राज्याच्या इतर भागातील कामगार परतू लागले आहेत. परप्रांतीय कामगारांना उद्योजक बोलावत आहेत. मात्र, ते परत येण्यास तयार नाहीत. त्यामुळे किमान दिवाळीपर्यंत हीच स्थिती राहणार असल्याचे काही उद्योजकांनी सांगितले. सीएनसी, व्हीएनसी यंत्रेही संगणकावर काम करतात. त्यामुळे या क्षेत्रात महिलांना जास्त रोजगाराची संधी आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामाची गरज भागविण्यासाठी स्थानिक महिलांसाठी आठ ते 15 दिवसांच्या अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत सीएनसी, व्हीएनसी यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आकडे बोलतात 

  • पुणे जिल्ह्यातील उद्योगांची संख्या - 40 ते 45,000 
  • पुणे जिल्ह्याबाहेर निघून गेलेल्या कामगारांची संख्या - 10 लाखांहून अधिक 
  • राज्याबाहेर निघून गेलेल्या कामगारांची टक्केवारी - 60 ते 65 टक्के 

महिलांना सीएनसी, व्हीएनसी यंत्रांचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात लवकरच पुणे जिल्हा उद्योग केंद्राशी बोलणी करून प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना त्यामुळे सरकारचे प्रमाणपत्रही मिळेल. महिलांसाठी हे प्रशिक्षण मोफत असणार आहे. साधारणपणे कुशल सीएनसी, व्हीएनसी मशिन ऑपरेटरला 20 ते 25 हजार रुपयांचे मासिक वेतन मिळते. 

- अभय भोर, अध्यक्ष - फोरम फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.