पिंपरी : खून, प्राणघातक हल्ला, मारहाण, वाहनांची तोडफोड असो की, दहशत माजविणे, यासाठी गुन्हेगारांकडून कोयत्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामुळे विविध घटनांमध्ये कोयत्यानेच घात होत असल्याचे दिसून येत आहे. (Large scale use Sickle criminals Pimpri-Chinchwad city)
कोयता हे हत्यार सहज उपलब्ध होत असल्याने गुन्ह्यांमध्येही कोयत्याचा वापर वाढला आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिस (police) आयुक्तालयाच्या हद्दीत घडणाऱ्या बहुतांश घटनांमध्ये गुन्हेगारांनी कोयत्याचाच वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी किमतीत व सहजरित्या हे हत्यार उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारांकडे हमखास कोयता आढळतो. यासह दरोडा, चोरीतील आदी गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडेही कोयता आढळतो.
विविध अवजारे बनविणाऱ्या ठिकाणी अथवा एखाद्या वर्कशॉपमधील मशिनवर लोखंडापासून कोयता बनविला जातो. त्याची कुठेही नोंद नसते. पोलिसांनी कोयता नेमका येतो कुठून, याचा शोध घेण्यासह कोयता बनविणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे.
मागील महिनाभरात घडलेल्या घटना
१४ जुलै : कोयता हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट; एकजण ताब्यात.
११ जुलै : चिखली येथे एकाचा भरदिवसा कोयत्याने वार करून खून झाला.
११ जुलै : पिंपरी येथे कोयता बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा.
८ जुलै : पिंपरीत तरुणावर कोयत्याने हल्ला.
३ जुलै : पिंपळे निलखला तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
२४ जून : बोपखलेमध्ये तरुणावर कोयत्याने वार करून वाहनांची तोडफोड.
२४ जून : निगडित कोयता बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
२२ जून : चिंचवडमध्ये टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.