School Admission : महापालिकेच्या शाळेतील प्रवेशासाठी चक्क रांगा; रात्रीपासूनच पालकांची गर्दी

पाल्याला प्रवेश घ्यायचाय? मग, रांगेत थांबा... असे महापालिकेच्या शाळेबाबत कुठे घडल्याचे तुम्ही ऐकले आहे. होय, हे घडलं आहे!
Line For municipal School Admission
Line For municipal School Admissionsakal
Updated on

पिंपरी - पाल्याला प्रवेश घ्यायचाय? मग, रांगेत थांबा... असे महापालिकेच्या शाळेबाबत कुठे घडल्याचे तुम्ही ऐकले आहे. होय, हे घडलं आहे! पिंपळे गुरव येथील पीसीएमसी सेमी-इंग्रजी मीडियम पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी चक्क रात्रीच रांगा लावल्या. त्यामुळे, ताटकळत ठेवण्याऐवजी टोकन देऊन त्यांना शाळा प्रशासनाकडून घरी परत पाठवावे लागले.

शहरातील नामवंत शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या रांगा लागतात. परंतु आता चित्र पालटायला सुरवात झाली आहे. पिंपळे गुरव पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या सेमी इंग्रजी शाळेत पाल्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी पालकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या.

सकाळपासून त्यांना ताटकळत ठेवण्यापेक्षा शिक्षकांनी टोकन देऊन त्यांना परत पाठवले. आता महापालिकेच्या शाळांमध्येही ई-लर्निंगसह अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येत आहेत. गरिबांच्या मुलांनाही नामवंत खासगी इंग्रजी शाळांप्रमाणे वातावरण मिळत आहे.

पिंपळे गुरव क्रमांक ५४ या शाळेची इमारत भव्य आहे. इमारतीला रंग दिल्याने ती आकर्षक दिसते. शाळेत प्रत्येक वर्गात स्मार्ट टिव्ही बसवले आहेत. त्यावर विद्यार्थ्यांना ई-लर्निंग शिक्षण दिले जाते. प्रशस्त क्रीडांगण असल्याने विविध खेळ शिकवले जातात. बालवाडी आणि पहिली ते सातवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीतून शिक्षण दिले जाते.

तब्बल ३५० पालक रांगेत

सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या पहिलीच्या वर्गातील १२६ जागांसाठी सुमारे ३५० पालक रांगेत उभे होते. पालकांना दिवसभर थांबावे लागू नये, यासाठी शिक्षकांनी टोकन देऊन त्यांना घरी पाठवावे लागले.

परकीय भाषांचेही ज्ञान

या शाळेत परकीय भाषा शिकविल्या जातात. फ्रेंच, जपानी, इटालियन भाषा शिकवल्या जातात. या शाळेत विद्यार्थी तयार होतात. उच्चशिक्षित शिक्षक वर्ग आहेत. त्यामुळे, शाळेत प्रवेशासाठी गर्दी होत आहे. शाळेचा पट वाढला आहे. शाळेने गुणवत्ता सिद्ध करून नावलौकिक वाढवला आहे.

स्पर्धा परीक्षांसह विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या या शाळेत पाल्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड असते. त्यामुळे, प्रवेशासाठी पालकांची मोठी गर्दी असते. पालकांनी शाळेच्या आवारात रांगा लावल्या होत्या. शिक्षक रामदास लेंभे हे प्रवेश प्रक्रिया राबवत आहे.

अशा आहेत अत्याधुनिक सेवा

  • इ-लर्निंग इंटर अ‍ॅक्टिव्ह बोर्डची लवकरच सुविधा

  • इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमासाठी सोय

  • सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, मोफत संगणक शिक्षण

  • सायन्स लॅब, सुसज्ज वाचनालय

  • मोफत गणवेश पाठ्यपुस्तक वाटप

  • अनुभवी, तज्ज्ञ उपक्रमशील शिक्षक

  • सर्व भौतिक सुविधा शाळा

  • विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ

  • विविध सहशालेय स्पर्धा शैक्षणिक उपक्रम

टोकननुसार सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल, असे शाळेकडून पालकांना कळविण्यात आले. तरीही सायंकाळी सहा वाजेपर्यंत पालकांची गर्दी कायम होती.

- योगिता परबत, शिक्षिका, इयत्ता पहिली

पहिली ते सातवीच्या वर्गात १ हजार ९२ हून अधिक विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी सातत्याने विशेष यश संपादन केले आहे. तसेच विविध शैक्षणिक उपक्रमही शाळेकडून राबविले जातात.

- साधना वाघमारे, मुख्याध्यापिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.