Loksabha Election : मावळातून बाळा भेगडे, तर शिरूरमधून महेश लांडगे तयार

मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री बाळा भेगडे, तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार महेश लांडगे आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
Bala Bhegade and Mahesh landage
Bala Bhegade and Mahesh landagesakal
Updated on

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री बाळा भेगडे, तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार महेश लांडगे आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भाजपने उमेदवारी दिली, तर लढण्यास तयार असल्याचे या दोघांनीही बुधवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत पिंपरी येथे स्पष्ट केले.

भाजपच्या वतीने मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी सरकारने घेतलेले निर्णय व कामांची माहिती भेगडे यांनी दिली. त्या वेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणूक लढण्याबाबत विचारले असता भेगडे म्हणाले, ‘पक्षाने सोपविलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणे, हे मी कर्तव्य समजतो. आताही पक्षाने दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. पक्षाने इतर कोणत्या उमेदवाराचे काम करण्यास सांगितले, तर त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली जाईल. परंतु, पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास मी लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे.’

Bala Bhegade and Mahesh landage
Water Lake : भोसरी एमआयडीसीतील रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे तळे

लांडगे यांनाही शिरूरबाबत विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये मी लढण्यासाठी इच्छुक होतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत लोकसभा लढण्यासाठी व निवडून येण्यासाठी इच्छुक आहे.’

मोदी सरकारच्या काळात झालेली कामे भाजप पदाधिकाऱ्यांनी वाचली. परंतु, महागाई, बेरोजगारी, नोटबंदीसारख्या मुद्द्यांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांना उत्तरे देता आली नाहीत. पत्रकार परिषदेला आमदार अश्‍विनी जगताप, आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, माई ढोरे, नामदेव ढाके, अमोल थोरात, मोरेश्‍वर शेडगे, वर्षा डहाळे आदी उपस्थित होते.

Bala Bhegade and Mahesh landage
Sant Tukaram Maharaj : देहूत पालखी प्रस्थानच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची ‘लगीनघाई’

पवना बंदिस्त जलवाहिनीवर तोडगा निघेल : भेगडे

केंद्र, राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता असताना पवना बंद जलवाहिनीचा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. याबाबत विचारणा झाल्यानंतर भेगडे म्हणाले, ‘तत्कालीन सरकार व राष्ट्रवादीच्या मंडळींनी पवना बंदिस्त जलवाहिनीचा विषय चुकीच्या पद्धतीने हाताळला. शहराला पाणी देण्यास मावळवासीयांचा विरोध नाही. विश्वासात घेऊन व शेतकऱ्यांचे प्रश्न विचारात घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने चर्चा होते, त्यामुळे पवना जलवाहिनीबाबत लवकरच तोडगा निघेल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.