नोकरीच्या शोधात आहात ! मग ‘स्मार्ट सारथी’ला भेट द्या

नोकरीच्या शोधात आहात ! मग ‘स्मार्ट सारथी’ला भेट द्या

Published on

पिंपरी, ता. १४ : ‘‘तुम्ही नोकरीच्या शोधात आहात ? मग, तुम्ही पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटीद्वारे विकसित ‘स्मार्ट सारथी जॉब पोर्टल’ला जरूर भेट द्या. उद्योगांनाही या पोर्टलमुळे कुशल मनुष्यबळही मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे, या पोर्टलला सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेने केले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्यावतीने शहरातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणून त्‍यांच्याद्वारे स्‍मार्ट सारथी जॉब पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
त्याबाबत लघुउद्योजक संघटनेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पीसीएमसी स्मार्ट सारथी हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांचे अधिकृत मोबाईल अॅप आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी अंतर्गत तरुणांसाठी ‘जॉब पोर्टल’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जॉब पोर्टलवर पिंपरी-चिंचवड शहरातील रोजगार संधींची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जॉब पोर्टल हे केवळ रोजगाराची माहिती देणारे पोर्टल आहे. जॉब पोर्टलमुळे युवक आणि तरुणांना रोजगाराची माहिती सुलभपणे उपलब्ध होणार आहे. तसेच विविध आस्थापनांना कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी देखील साहाय्य होणार आहे. या जॉब पोर्टलमुळे रोजगाराच्या शोधात असणारे तरूण आणि शहरातील आस्थापना यांच्या दरम्यान एक सेतू निर्माण होणार आहे. रोजगार उपलब्ध होऊन स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत मिळणार आहे. ॲप अथवा पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या माहितीस संबंधित कंपनी सर्वस्वी जबाबदार राहणार आहे.
कंपन्यांनी रिक्त जागांची माहिती द्यावी
या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक उद्योजकांनी त्यात सहभागी व्‍हावे. कंपन्‍यांनी रिक्त जागांची माहिती द्यावी. या रिक्त जागा पिंपरी-चिंचवड स्मार्ट सारथी जॉब पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जातील. त्याने ही माहिती व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि भरती प्रक्रिया सुलभ होणार आहे. हा उपक्रम सुलभ करण्यासाठी नमूद केलेला तपशील पीडीएफ स्वरूपात cep@pcmcindia.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावा, असे आवाहनही संघटनेने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.