पिंपरी : चिखली येथील घरकुल परिसरात गेल्या महिनाभर कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. गेले महिनाभर कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे टाक्या पूर्ण भरत नाहीत. प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास हंडा मोर्चा काढू असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. घरकुलमध्ये २२ हजार नागरिक राहत आहेत. प्रत्येक इमारतीत ४२ सदनिका असून अंदाजे १७० नागरिक एका सोसायटीमध्ये राहतात. अशा १४० सोसायटीत लोक रहायला आले आहेत. टेरेसवर असलेल्या मोठ्या टाकीत पाणी संचय झाल्या नंतर दिवसभर गृहिणींना दैनंदिन कपडे, धुणी भांडी यासाठी पाणी पुरत असे, आता पाणी पुरेसे येत नसल्याने अडचण होत आहे. या दाट लोकवस्तीला प्राधान्याने नियमित पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. रात्री १ वाजता पाणी येते व पहाटे ४ ला बंद होते.
सोसायटीतील पाणी सकाळी ९ वाजता जाते. यातच सर्व सोसायटीत पाणी मीटर नवीन बदलून दिले आहेत. परिणामी यात फक्त हवा येते. मिटर रीडिंग फिरते , पण पाणी येत नाही. त्यामुळे रोज सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना पाणी कसे पुरवावे हा यक्ष प्रश्न आहे. टँकरने पाणी विकत घेणे परवडत नसल्याने सोसायटीत वाद निर्माण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पाण्याची तक्रार नव्हती पण आत्ता रोज तक्रारी येत आहेत.
अधिकारी फक्त दिवस ढकलत आहेत. येत्या चार दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर गुरुवारी पालिकेत हंडा मोर्चा काढला जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. स्थानिक नागरिक म्हणतात विकासराजे केदारी ः ‘‘पूर्वी दिवसा पाणी पुरवठा पूर्ण दाबाने व्हायचा. नागरिकांची मागणी नसताना नवीन ऑटो रीडिंग पाण्याचे मीटर महापालिकेने कशासाठी बसवले? बसविल्यानंतर पाणी पुरवठा रात्रीचा सुरू केला आहे.मीटरमध्ये तांत्रिक दोष असण्याची शक्यता आहे.
झोपायच्या वेळेला पाणी देऊन काय फायदा? पाणी नसल्यामुळे महिलावर्ग त्रस्त आहे. ’’ उदयकुमार पाटील ‘‘पाणीतूटवड्याची नागरिकांना सवय झाली झाली आहे. आता पाणी कधी येईल सांगता येत नाही.पाणी वितरण व्यवस्था कोसळली आहे.माणशी ५००लिटर पाणी लागते. चार तास पूर्ण दाबाने पाणी येत नाही. कोरोना काळापासून पाणी व्यवस्थापन बिघडले आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.