पिंपरी : कोरोनाचे संकट आल्यानंतर मोठ्या भावाप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आमच्या मदतीसाठी कोणी धावले असेल; तर ते आमदार महेश लांडगे होते. कोरोनातील त्यांचे सहकार्य आम्ही कधीच विसरू शकत नाही. आम्ही कुटुंबापासून लांब होतो. मात्र, त्यावेळी आमदार लांडगे यांनी आमची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली, अशी भावना पूर्वांचल विकास मंचाद्वारे आयोजित उत्तर भारतीय संमेलनात व्यक्त करण्यात आली.