- अश्र्विनी पवार
पिंपरी - देशामध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, आधी वयाच्या चाळिशीनंतर होणारा मधुमेह हा आता २० ते ३० वर्षे वयोगटातही आढळून येत आहे. याशिवाय काही प्रकरणांत कमी वयातही मधुमेह आढळून येत आहे. त्यामध्ये ‘टाइप २’ होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पुढील पिढीचा मधुमेहापासून बचाव करायचा असेल; तर लहानपणापासूनच काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करावा, असे तज्ज्ञ सांगतात.