Shrirang Barne: "अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही"; श्रीरंग बारणेंची खदखद

बारणेंनी आपल्याला कुठून किती लीड मिळेल? याचा दावाही केला आहे.
Shrirang Barne
Shrirang Barne
Updated on

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही, अशी खदखद महायुतीचे लोकसभेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे. तसेच आपण इथं २ लाखांहून अधिक मताधिक्यानं निवडून येऊन असा दावाही केला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरे सेनेचे संजोग वाघिरे यांनी आपण १ लाख ७२ हजार मतांनी निवडून येऊ असा दावा केला आहे. (Maval Loksabha Constituency some of Ajit Pawar workers did not campaign for me says Srirang Barane)

Shrirang Barne
Pune Pub Policy: अपघातप्रकरणी उलटसुलट आरोप झाल्यानं पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा! 'पब्ज'बाबत दोन दिवसांत आणणार नवीन धोरण

बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. या सर्व आमदारांनी माझ्यासाठी चांगलं काम केलं आहे. यांपैकी पिंपरी-चिंचवड आणि पनवेल या दोन महानगरांचा समावेश होतो. या दोन्ही महानगरांमध्ये ठाकरेंच्या सेनेची आधीही नव्हती आणि आत्ताही ताकद नाही.

Shrirang Barne
Kyrgyzstan Violence : किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले; होणार ऑनलाईन परीक्षा

या मतदारसांतील एकूण मतदानापैकी चिंचवडमध्ये झालेल्या ३ लाख २२ हजार मतदानापेक्षा मला २ लाखांहून अधिक मत मिळतील. तर एक लाखांहून अधिक लीड राहिल. त्याचबरोबर पनवेलमध्ये मला सुमारे १ लाख ८० हजार इतकं मतदान होईल, तिथंही लीड ७० ते ८० हजारांचा राहिलं आणि हे लीड कोणीही तोडू शकणार नाही, असा दावाही यावेळी बारणे यांनी केला आहे.

Shrirang Barne
Pune Porsche Car Accident: पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अन्यथा...; संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी काम केलं नाही हे सांगताना बारणे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या. तसेच ते माझ्या दोन सभेला उपस्थिततही होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि आमदारांनीही माझ्यासाठी काम केलं. पण राष्ट्रवादीच्या तळातल्या खालच्या कार्यकर्त्यांपैकी काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. याची यादी आम्ही अजित पवारांना दिली होती" जर शंभर टक्के कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवारांचं टिपॉझिटही जप्त झालं असतं, असा मोठा दावाही त्यांनी केला.

Shrirang Barne
Ahmednagar News : ऑनलाईन पद्धतीने तरुणास घटस्फोट; अहमदनगर कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय

पार्थ पवारांचा गेल्या पराभवामुळं हा फटका त्यांना बसला का? यावरही श्रीरंग बारणे व्यक्त झाले ते म्हणाले, असा कुठलाही प्रकार या निवडणुकीत नव्हता कारण अजित पवारांनी तसे स्पष्ट निर्देश दिले होते. या सर्व निवडणुकीत पार्थ पवारांच्या मातोश्री सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. त्या एकदा भोसरी इथं आल्या होत्या त्यावेळी त्यांनी चिंचवड आणि पिंपरीच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की, बारणेंचं काम आपल्याला करायंच आहे. त्यामुळं त्यांची मला खरंतर मदतच झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.