Shravan Kumar : आईला घेऊन जगभ्रमंतीला निघालेला आधुनिक श्रावणबाळ थेरगावत दाखल

दोन दिवस देणार पुणे व पिंपरी-चिंचवड शहारातील धार्मिक-ऐतिहासिक स्थळांना भेट
modern day Shravan bal who went on world tour with his mother entered thergaon
modern day Shravan bal who went on world tour with his mother entered thergaonSakal
Updated on

- बेलाजी पात्रे

वाकड : वृद्ध आई वडिलांची सेवा करणारा आदर्श पुत्र श्रावण बाळ व भक्त कुंडलिक यांच्या थोरव्या सर्वांनी लहानपणासुनच ऐकल्या आहेत. प्रत्येक धर्मात आई-वडिलांना देवासमान दर्जा दिला आहे. काळाने कितीही प्रगती केली तरी असे आदर्श आजही दिसतातच. असेच दृश्य शुक्रवारी (ता. ६) थेरगावातील राघवेंद्र स्वामींच्या प्रसूनधाम मठात पहायला मिळाले.

वृद्धत्वापर्यंत जबाबदारीच्या ओझ्याखाली घराचा उंबराही ओलांडू न शकलेल्या आईला संपूर्ण भारत आणि जग स्कुटरवर स्व खर्चातून दाखविण्याचा संकल्प करून प्रवास करणाऱ्या या आधुनिक श्रावण बाळाचे त्याच्या मातेसह शुक्रवारी (ता. ६) पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगावात आगमन झाले.

आईला घेऊन डी. कृष्ण कुमार शुक्रवारी सकाळी पिंपरी-चिंचवडच्या थेरगावातील राघवेंद्र स्वामी प्रसूनधाम मठात पोहचला. येथे प्रसूनधाम मठासह पुनावळे बालाजी मंदिर व अन्य ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आहेत शहराचे वैभव, मोठाले रस्ते, विविध उद्याने, हौतात्यांचे पुतळे, आयटी पार्क हिंजवडी,

वाकड-हिंजवडीचे श्री म्हातोबा मंदिर पाहून त्यांना आनंद झाला. तसेच पुणे दर्शन करून ते पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, मोरया गोसावी मंदिर, दुर्गादेवी टेकडी उद्यान, अप्पूघर, खंडोबामाळ, देहू-आळंदी व अन्य काही स्थळांना भेट देणार असल्याचे सकाळशी बोलताना त्यांनी सांगितले.

कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील एका बहुराष्ट्रीय बड्या आयटी कंपनीत आयटी अभियंता व टीम लीडर असलेल्या डी.कृष्ण कुमार (४४) यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर नोकरीवर पाणी सोडत त्यांच्या आई चुडा रत्नम्मा (७३) यांच्यासाठी मातृ सेवा संकल्प केला आहे. आपले उर्वरित आयुष्य आपल्या आईच्या सेवेसाठी समर्पित केले आहे.

आई आणि मुलाने स्कूटरवरून आतापर्यंत सुमारे ७५ हजार किमीचा प्रवास केला. २०१८ मध्ये म्हैसूरहून भारत भ्रमंतीला निघालेले हे माता आणि पुत्र तब्बल पाच वर्षांपासून भ्रमंती करत असून अनेक महत्वपूर्ण शहरे, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे व मंदिरांना भेटी दिल्या आहेत.

१६ जानेवारी २०१८ रोजी म्हैसूर, कर्नाटक येथे मातृसेवा आयोजित करण्यात आली होती. तेथूनच डी. कृष्ण कुमार यांनी संकल्प यात्रा सुरू केली. सहा वर्षात त्यांनी आई चुडा रत्नम्मासोबत सुमारे ७५ हजार किमीचा प्रवास केला आहे.

आत्तापर्यंत त्यांनी नेपाळ, भूतान, म्यानमार, काश्मीर ते कन्याकुमारी आणि इतर ठिकाणी स्कूटरवर प्रवास केला आहे. राजस्थानमधील जयपूर, अजमेर, पुष्कर, चित्तोडगड, सावरिया, उदयपूर, माउंट अबूू करून ते मुंबईत आले. तिथून खपोली, पनवेल, लोणावळा, मावळ करत ते गुरुवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले.

जिवंत आई-वाडीलांनाच देव माना असा संदेश देत ते वडिलांनी दिलेली स्कुटर म्हणजे वडीलच स्कुटर रूपाने आपल्या सोबत आहेत असे मानून प्रवास करत आहेत. ते प्रवासात धार्मीक स्थळे, मंदिरे, मठ, धर्मशाळा यांमध्ये मुक्काम व गुजराण करतात. कुठलाही बडेजाव न करता अत्यंत साधे अध्यात्मिक जीवन जगत आहेत.

या आदर्श पुत्राने माझ्या पोटी जन्म घेतल्याने मी धन्य झाले. माझे संपूर्ण आयुष्य केवळ स्वयंपाकघरात गेले. या वयात माझा मुलगा मला देशातील आणि जगातील मंदिरे आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी घेऊन गेला. तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आम्ही जीवन अर्थपूर्ण केले. तो प्रथम मला खायला घालतो, नंतर स्वतः खातो. रात्रंदिवस माझी सेवा करतो. असा पुत्र मिळाल्याने मी धन्य आहे.त्यामुळे या वयात देखील स्कुटरवर तासनतास प्रवास करण्यास मला उर्मी मिळत आहे.

- चुडा रत्नम्मा (आई)

वयाच्या ६८ व्या वर्षापर्यंत आईला काहीच पाहता आले नाही आमचा दहा सदस्यांचा मोठा परिवार असून सर्व जबाबदारी आईकडेच होती. वडिल हयात असताना आईने वयाच्या ६८ व्या वर्षांपर्यंत काहीही पाहिले नव्हते. वडिलांचे २०१५ मध्ये निधन झाले. त्यावेळी मी बंगळूरुमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कॉर्पोरेट टीम लीडर म्हणून काम करत होतो. मी आईला बंगळूरुला बोलावले. २०१८ मध्ये मी आईला विचारले की, तु तीर्नमवेली, तिरुपती तीरवन्दमन्मपुरमसह इतर सर्व मंदिरे पाहिली नाहीत का ? तेव्हा माझ्या आईने माझ्याकडे निराशेने पाहिले आणि म्हणाली की मीआजवर घरा शेजाराच्यामंदिरातही गेले नाही. त्याच दिवशी मी नोकरीचा राजीनामा दिला.

- डी. कृष्ण कुमार (आईला भरत व जगभ्रमंती करवणारा पुत्र)

या माता पुत्राने महाराष्ट्रातील भीमाशंकर, महाबळेश्वर, शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, शनि सिंगणापूर, अष्टविनायक, कृष्णेश्वर, औरंगाबाद, जालना, अजिंठा, वेरूळ, सातारा, सज्जनगड, सांगली, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर, नरसोबाची वाडी, गणेशवाडी, नौबाग, कागल, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, गोंदावले, बीड, नांदेड, लातूर, अक्कलकोट, जत, मिरज, नागपूर या ठिकाणी अनेक स्थळांना भेट दिली असून पुण्यात दगडू शेठ हलवाई गणपती, शनिवारवाडा, शुंगेरी शंकर मठ, शंकर महाराज मठ, चतु:शृंगी मंदिर, जंगली महाराज मठ यासह सर्व धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना ते भेट देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.